Join us  

भारताने मालिका जिंकली, दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी मात

मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या झटपट खेळीनंतर गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर भारताने तिसरा आणि अखेरचा ट्वेंटी-२0 सामना ७ धावांनी जिंकताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-१ ने जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 12:56 AM

Open in App

केपटाऊन : मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या झटपट खेळीनंतर गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीच्या बळावर भारताने तिसरा आणि अखेरचा ट्वेंटी-२0 सामना ७ धावांनी जिंकताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-१ ने जिंकली.भारताने विजयासाठी दिलेल्या १७३ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २0 षटकांत ६ बाद १६५ पर्यंत मजल मारु शकला.दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार जेपी ड्युमिनी याने सर्वाधिक ४१ चेंडूंत ३ षटकार व २ चौकारांसह ५५ धावा केल्या. क्रिस्टियान जोंकर याने२४ चेंडूंतच ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावांची वादळी खेळी केली. डेव्हिड मिलरने २४ धावांचे योगदान दिले. भारताकडून भुवनेश्वर कुमार २४ धावांत २ गडी बाद केले. तत्पूर्वी, भारताने २0 षटकात ७ बाद १७२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.भारताकडून शिखर धवन याने सर्वाधिक ४० चेंडूंत ३ चौकारांसह ४७ धावा केल्या. सुरेश रैनाने २७ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४३ धावांची आक्रमक खेळी केली. हार्दिक पांड्याने १७ चेंडूंत एका षटकारासह २१ धावांचे योगदान दिले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा सांभाळणारा रोहित शर्मा ११, महेंद्रसिंग धोनी १३, मनीष पांडे १३ धावांवर बाद झाले. दक्षिण आफ्रिकेकडून ज्युनिअर डाला सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३५ धावांत ३ गडी बाद केले. त्याला ख्रिस मॉरीसने ४३ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली.भारताची सुरुवात सनसनाटी झाली. मॉरीसने टाकलेल्या पहिल्याच षटकात लागोपाठ दोन चौकार ठोकणारा रोहित शर्मा ११ धावांवर डालाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी दुस-या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी करीत डावाला आकार दिला. रैना परतल्यानंतर शिखर धवनने मनीष पांडेच्या साथीने ३२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र भारतातर्फे मोठी भागीदारी होऊ शकली नाही. तरीदेखील २० षटकांत ७ बाद १७२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.धावफलकभारत : रोहित शर्मा पायचीत गो. डाला ११, शिखर धवन धावबाद ४७, सुरेश रैना झे. बेहारदीन गो. शम्सी ४३, मनीष पांडे झे. मिलर गो. डाला १३, हार्दिक पांड्या झे. क्लासेन गो. मॉरीस २१, धोनी झे. मिलर गो. डाला १२, दिनेश कार्तिक पायचीत गो. मॉरीस १३, अक्षर पटेल नाबाद १, भुवनेश्वर कुमार नाबाद ३, अवांतर : ८, एकूण : २० षटकांत ७ बाद १७२.गोलंदाजी : मॉरीस ४-०-४३-२, डाला ४-०-३५-३, ड्युमिनी ३-०-२२-०, फेहलुकावायो ३-०-२६-०, शम्सी ४-०-३१-१, अ‍ॅरोन फांगिसो २-०-१३-०.दक्षिण आफ्रिका : हेंड्रिक्स झे. धवन गो. कुमार ७, मिलर झे. पटेल गो. रैना २४, ड्युमिनी झे. शर्मा गो. ठाकूर ५५, क्लासेन झे. कुमार गो. पांड्य ७, जोंकर झे. रोहित गो. कुमार ४९, मॉरीस त्रि. गो. बुमराह ४, बेहारदीन नाबाद १५.अवांतर : ४, एकूण : २0 षटकात ६ बाद १६५. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-0-२४-२, बुमराह ४-0-३९-१, शार्दूल ठाकूर ४-0-३५-१, पांड्या ४-0-२२-१. सुरेश रैना ३-0-२७-१, अक्षर पटेल १-0-१६-0.

टॅग्स :क्रिकेट