Join us

भारत अ चा इंग्लंडवर विजय

सलामीवीर मयांक अग्रवाल याने सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळीच्या जोरावर भारत अ संघाने इंग्लंड लायन्सवर १०२ धावांनी विजय मिळवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 05:23 IST

Open in App

लीसेस्टर : सलामीवीर मयांक अग्रवाल याने सलग दुसऱ्या सामन्यात शतकी खेळीच्या जोरावर भारत अ संघाने इंग्लंड लायन्सवर १०२ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड लायन्सला ३१० धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २०७ धावांवर सर्वबाद झाला.तीन देशांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताने इंग्लंड लायन्स विरोधात निर्धारीत ५० षटकांत ६ बाद ३०९ धावा केल्या.मयांक याने १०४ चेंडूत १० चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ११२ धावा केल्या. गेल्या चार सामन्यात त्याने तिसºयांदा शतकी खेळी केली आहे. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यात मयांक आणि शुभमान गिल यांनी हा निर्णय योग्य ठरलावा.संक्षिप्त धावफलक :भारत अ ५० षटकांत ७ बाद ३०९ धावा ( मयांक अग्रवाल ११२, शुभमान गिल ७२, हनुमा विहारी ६९, दीपक हुड्डा ३३, गोलंदाजी- मॅथ्यु फिशर २/५८, एड बर्नाड २/५१.)इंग्लंड ४१.२ षटकांत सर्वबाद २०७,( बेन फोक्स ३२, एड बर्नाड ३१, लियाम डॉसन ३८ गोलंदाजी : शार्दुल ठाकूर ३/५३, खलील अहमद २ /३०).

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड