Join us  

भारत - बांगलादेश क्रिकेट सामना : वाहतुकीची कोंडी होऊ देणार नाही ; पोलिसांची हमी, जोरदार तयारी

भारत आणि बांगला देशदरम्यान उद्या रविवारी येथील जामठा स्टेडियमवर होणाऱ्या टी - २० क्रिकेट सामन्यासाठी पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 10:20 PM

Open in App
ठळक मुद्दे५० हजार प्रेक्षकांची अपेक्षा४५० वाहतूक शाखेचे पोलीस रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत आणि बांगला देशदरम्यान उद्या रविवारी येथील जामठा स्टेडियमवर होणाऱ्या टी - २० क्रिकेट सामन्यासाठी पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली आहे. प्रत्येक सामन्याच्या दिवशी वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. ती यावेळी होणार नाही अशी व्यवस्था आम्ही केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित आणि परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक मासाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.हा एक दिवसीय सामना पाहण्यासाठी सुमारे ५० हजार प्रेक्षक येण्याची अपेक्षा आहे. अर्धेअधिक क्रिकेट रसिक आपापल्या वाहनांनी स्टेडियमवर येतात. एकाच वेळी हजारो वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होते. अपघाताची भीती वाढते. वाहतूक रखडल्यास रुग्ण घेऊन येणारी अ‍ॅम्बुलन्स अडकते, त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. हा एकूणच प्रकार लक्षात घेऊन वाहतुकीत कसलाही अडसर निर्माण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचे उपरोक्त अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली. वाहतूक शाखेच्या ४५० कर्मचाऱ्यांना वर्धा मार्गावर तैनात करण्यात आले. सामना पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या पार्किंगची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग वगळता रस्त्यावर कुठे वाहने उभी केल्यास ती पोलीस उचलून नेतील. त्यासाठी पोलिसांनी क्रेनची व्यवस्था केली आहे. सामन्यादरम्यान जड वाहनांना दूरवर अडवून ठेवले जाणार आहे. सामना संपल्यानंतर प्रत्येकाला घाई सुटते. अशात रस्त्यावर जड वाहने धावत असल्यास अपघाताची भीती असते. अपघात झाल्यास वाहतुकीची कोंडी होते.सामना संपल्यानंतर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहनचालकांना दोन्ही बाजूकडील लेनवरून आपली वाहने नेण्याची मुभा (काही वेळेसाठी) देण्यात येणार असल्याचे उपरोक्त पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.हैदराबाद चंद्रपूर आणि वर्धेकडून येणारी जड वाहने बुटीबोरी येथे, कामठी, भंडारा आऊटर रिंग रोडने येणारी वाहने वेळाहरी टोलनाक्याजवळ तर अमरावती रोडने येणारी वाहने मोहगाव झिल्पी फाट्याजवळ सामना संपेपर्यंत रोखण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून दुपारी २ वाजतापासूनच प्रेक्षकांना स्टेडियअमची दारे उघडी केली जाणार आहे. प्रेक्षकांची दोन ठिकाणी तपासणी केली जाईल. काही आक्षेपार्ह वस्तू सापडल्यास त्या काढून घेण्यात येतील. प्रेक्षकांना पाण्याच्या बॉटल्स किंवा खाण्यापिण्याच्या चीजवस्तू आतमध्ये नेण्यास मनाई आहे.ठिकठिकाणाहून वाहतूक वळविणारमानकापूर चौक, काटोल नाका, वाडी नाका, हिंगणा नाक्याकडून येणारी आणि छत्रपती चौकातून वर्धा रोडकडे येणारी वाहने दुसऱ्या मार्गानेवळविण्यात आली आहेत. ही वाहने छत्रपती चौकातून श्रीनगर, शताब्दी चौक, मानेवाडा चौक, म्हाळगीनगर चौक, चामट चक्की उड्डाण पुलाखालून उजवे वळण घेऊन दिघोरी नाका, उमरेड मार्गावरून बुटीबोरीकडे आणि नंतर पुढे जातील. कामठी रोडने येणारी जड वाहने मारुती शोरूम, शीतला माता मंदिर, जुना पारडी नाका, प्रजापती चौक, चामट चौकातून डावीकडे दिघोरी नाका येथून उमरेडकडे आणि तेथून बुटीबोरीकडे जातील. भंडारा रोडने येणारी वाहने कापसी पुलाखालून डाव्या बाजूने वळून आऊटर रिंग रोडवर जातील. प्रेरणा कॉलेजजवळून डावे वळण घेऊन पुढे उमरेड आणि बुटीबोरीकडे जातील.असा आहे पोलीस बंदोबस्तसध्याचे वातावरण लक्षात घेता पोलिसांनी स्टेडियमच्या आत-बाहेर, क्रिकेटपटूंच्या राहण्याच्या ठिकाणी कडक बंदोबस्त लावला आहे. अप्पर पोलिस आयुक्त (दक्षिण) डॉ. शशिकांत महावरकर यांच्या देखरेखीत दोन पोलीस उपायुक्त, १८ पोलीस निरीक्षक, ५२ सहायक निरीक्षक तसेच ३९९ पुरुष आणि ८१ महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी ४५० पोलीस नेमण्यात आले आहेत.

टॅग्स :नागपूर पोलीसवाहतूक पोलीसविदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठामाध्यमे