ट्वेन्टी-२०नंतर आता वनडे मालिका जिंकायला भारत सज्ज

खेळाडूंची दुखापत चिंतेचा विषय, न्यूझीलंडविरुद्ध पहिली लढत आज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:09 PM2020-02-04T23:09:19+5:302020-02-04T23:13:21+5:30

whatsapp join usJoin us
India are ready to win ODI series after Twenty20 | ट्वेन्टी-२०नंतर आता वनडे मालिका जिंकायला भारत सज्ज

ट्वेन्टी-२०नंतर आता वनडे मालिका जिंकायला भारत सज्ज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हॅमिल्टन : प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्येमुळे भारतीय संघात पृथ्वी शॉसारख्या प्रतिभावान युवा खेळाडूसाठी दरवाजे उघडल्या गेले असून, तो बुधवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत आत्मविश्वासाचा अभाव जाणवत असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे.


गेल्या वर्षी झालेल्या विश्वकप स्पर्धेनंतर भारतीय संघासाठी ही तिसरी वन-डे मालिका आहे. संघाने यापूर्वी वेस्ट इंडिज (विदेशात) आणि मायदेशातील मालिकेत आॅस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.
न्यूझीलंड संघ विश्वकप फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर प्रथमच वन-डे लढत खेळणार आहे. यापूर्वी उभय संघांदरम्यान वन-डे लढत खेळल्या गेली होती. त्यावेळी न्यूझीलंडने मँचेरस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेच्या दुसºया उपांत्य लढतीत भारताचा १८ धावांनी पराभव करीत स्पर्धेबाहेर केले होते.


भारताने या पराभवाची परतफेड रविवारी संपलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत ५-० ने विजय मिळवत केली. सध्या वन-डे मालिकेला अधिक महत्त्व नाही. कारण उभय संघ यंदा आॅस्ट्रेलियात खेळल्या जाणाºया टी-२० विश्वकप स्पर्धेची तयारी करीत आहेत. तसे या महिन्याच्या शेवटी प्रारंभ होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका या मालिकेच्या तुलनेत अधिक महत्त्वाची आहे.
वन-डे मालिकेत उभय संघ खेळाडूंच्या दुखापतीमुळे अडचणीत आहेत आणि अशास्थितीत काही युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.
रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. टी-२० मालिकेच्या अखेरच्या लढतीत दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो वन-डे मालिकेतून ‘आऊट’ झाला. शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांच्यासारखे महत्त्वाचे खेळाडू यापूर्वीच दुखापतग्रस्त आहेत.
न्यूझीलंड संघ प्रेरणादायक कर्णधार केन विलियम्सनविना मैदानात उतरणार आहे. तो दुखापतग्रस्त आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टही दुखापतग्रस्त असल्यामुळे यापूर्वीच संघाच्या बाहेर आहे.


मयंक अग्रवालला वन-डे मालिकेसाठी रोहितच्या स्थानी संघात जागा मिळाली आहे. कर्णधार विराट कोहलीने सांगितले की, राजकोटमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्धची रणनीती कायम ठेवणार आहे. तेथे लोकेश राहुलने यष्टिरक्षण करताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
कोहलीने एकप्रकारे संकेत दिले की, शॉ बुधवारी भारतीय डावाची सुरुवात करेल. असे जर घडले तर दोन सलामीवीर फलंदाज आपल्या पदार्पणाच्या लढतीत डावाची सुरुवात करतील.
यापूर्वी अशी स्थिती २०१६ मध्ये आली होती. त्यावेळी लोकेश राहुल व करुण नायर यांनी झिम्बाब्वेमध्ये आपल्या पदार्पणाच्या लढतीत भारतातर्फे डावाची सुरुवात केली होती.
त्याआधी, सुनील गावस्कर व सुधीर नाईक (१९७४) इंग्लंडविरुद्ध तर पार्थसारथी शर्मा व दिलीप वेंगसरकर (१९७६) न्यूझीलंडविरुद्ध यांनी अशी कामगिरी केली होती.
कोहली तिसºया क्रमांकावर फलंदाजीला येईल तर श्रेयस अय्यर चौथ्या व राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. नेटस््मध्ये शिवम दुबे, रिषभ पंत आणि केदार जाधव यांच्यापूर्वी मनीष पांडे कोहली व अय्यरसोबत सराव करताना दिसला. जर पांडे खेळणार असेल तर संघात रवींद्र जडेजा, दुबे व जाधव यांच्यापैकी कुणा एका अष्टपैलूला संधी मिळेल.


गोलंदाजी आक्रमणामध्ये भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह उतरेल. टी-२० मालिकेत ड्रेसिंग रुममध्ये बसणारा डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते.
नियमित कर्णधार विलियम्सनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल. साऊदीच्या तुलनेत कर्णधारपदासाठी त्याला झुकते माप देण्यात आले आहे. साऊदी टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यात कर्णधार होता. यात संघाला रॉस टेलरच्या अनुभवाची साथ लाभेल.
जिमी निशम व कॉलिन डी ग्रँडहोम यांच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूंच्या समावेशामुळे संघ मजबूत झाला आहे. यष्टिरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल व वेगवान गोलंदाज काईल जेमिसन संघात नवे खेळाडू आहेत.


प्रतिस्पर्धी संघ
भारत :- विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी.
न्यूझीलँड :- टॉम लॅथम (कर्णधार व विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, कॉलिन डी ग्रँडहोम, जिमी निशम, स्कॉट कुगलेइजन, टॉम ब्लंडेल, हेन्री निकोल्स, मिशेल सँटनर, हॅमिश बेनेट, ईश सोढी, टीम साऊदी, काइल जेमिसन, मार्क चॅपमेन.

सामना : भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० पासून.

Web Title: India are ready to win ODI series after Twenty20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.