Join us  

हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; बराच काळ राहणार क्रिकेटपासून दूर

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 10:52 AM

Open in App

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दुखापतीमुळे हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आता त्याला मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून लांब रहावे लागू शकते. भारतीय क्रिकेटपटूंनी हार्दिकला लवकर बरा हो, असे मॅसेज पाठवले आहेत.

हार्दिकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत दुखापत झाली होती. ही दुखापत त्यावेळीही गंभीर होती. कारण त्यावेळी हार्दिकला स्ट्रेचरवरून मैदानातून बाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर हार्दिक दुखापतीमधून सावरला होता. लंडनमध्ये झालेल्या विश्वचषकातही हार्दिक खेळला होता. पण सधाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिकने माघार घेतली होती. पण आता त्याच्या दुखापतींची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हार्दिकला आता शस्त्रक्रिया करावी लागणार होती. 

आशिया चषकात  पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला मैदानात दुखापत झाली होती. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. या सामन्यातील अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

टॅग्स :हार्दिक पांड्याबीसीसीआयआशिया चषकवर्ल्ड कप 2019