Join us  

Independence Day 2020 : इरफान पठाणच्या एका ट्विटनं जिंकली लाखो मनं; खेळाडूंकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Independence Day 2020 : अजिंक्य रहाणेसह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, सलामीवीर शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनीही स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देताना भारतीन सैन्याच्या शौर्याला केला सलाम..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 10:03 AM

Open in App

आज देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशवासिय आज अनेक संकटांसोबत लढत आहेत. कोरोना, पूर, भूस्खलन आदी संकटांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही मदत करत आहोत. तसेच राज्यांवरील आपत्तीवर केंद्र सरकार मिळून मदत करत आहे. कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतीय खेळाडूंनीही स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, इरफान पठाणच्या ट्विटनं लाखोंची मनं जिंकली.

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनंही एक व्हिडीओ ट्विट करून शुभेच्छा दिल्या. त्यात त्यानं म्हटलं की,''सर्वांना स्वात्र्यंत दिवसाच्या शुभेच्छा. मला आजही आठवतं की लहानपणी आम्ही या दिवसाची आतुरतेनं वाट पाहायचो. सकाळी आम्ही तयार होऊन ध्वजारोहणासाठी शाळेत जायचो आणि त्यानंतर आम्हाला मिठाई दिली जायची. त्यानंतर मी क्रिकेट सरावाला जायचो. राष्ट्रगीत गाताना नेमही अभिमान वाटायचा आणि देशाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हायची. आज पुन्हा ती जबाबदारी पार पाडण्याचा क्षण आला आहे. आपल्या देशाला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी ती जबाबदारी सर्वांना पार पाडायला हवी. घरातील वृद्धांची काळजी घ्या, एकमेकांना मदत करा.'' इरफान पठाणनं ट्विट केलं की,''मीने ख्वाब में सोने की चिड़िया को परवां चढते हुये देखा है, चिड़िया ने दाने कई रंग के खाये हो लेकिन उसके जिस्म पर रंग सिरफ तिरंगा देखा है।''   मोहम्मद कैफ अन् युवराज सिंग यांनीही ट्विट केलं.    

टॅग्स :स्वातंत्र्य दिनइरफान पठाणविराट कोहलीअजिंक्य रहाणेविरेंद्र सेहवागयुवराज सिंगशिखर धवन