IND vs WIN ODI : अखेरचा सामना असल्यामुळे धोनीचा स्टेडियमबाहेर कट-आऊट?

तिरुवनंतपुरमच्या स्टेडियमबाहेर धोनीचा 35 फुटाचा कट-आऊट उभारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 08:38 PM2018-10-31T20:38:56+5:302018-10-31T21:00:08+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WIN ODI: Dhoni's cut-out outside the stadium of last match? | IND vs WIN ODI : अखेरचा सामना असल्यामुळे धोनीचा स्टेडियमबाहेर कट-आऊट?

IND vs WIN ODI : अखेरचा सामना असल्यामुळे धोनीचा स्टेडियमबाहेर कट-आऊट?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देऑल केरळ धोनी फॅन्स असोसिएशनने आपल्या लाडक्या धोनीचा 35 फूट कट-आऊट करण्याचे ठरवले होते. आता सामन्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा कट आऊट लावला आहे.

नवी दिल्ली, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वेस्ट इंडिजविरुद्धचा पाचवा सामना अखेरचा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच कदाचित तिरुवनंतपुरमच्या स्टेडियमबाहेर धोनीचा 35 फुटाचा कट-आऊट उभारला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा सामना तिरुवनंतपुरम येथे रंगणार आहे. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत असला तरी त्याचे केरळमध्येही भरपूर चाहते आहे. येथील ऑल केरळ धोनी फॅन्स असोसिएशनने आपल्या लाडक्या धोनीचा 35 फूट कट-आऊट करण्याचे ठरवले होते. आता सामन्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा कट आऊट लावला आहे.

हा पाहा व्हिडीओ


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा सामना तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर धोनी भारतात वनडे खेळणार नाही, असे काही क्रिकेट पंडितांनी म्हटले आहे. कारण या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा असेल. या दौऱ्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळायला जाणार आहे. विश्वचषकानंतर धोनी राजीनामा देणार, असे म्हटले जात आहे. त्यामुळे धोनीचा उद्या होणारा भारतातील अखेरचा सामना असेल, असे म्हटले जात आहे.

Web Title: IND vs WIN ODI: Dhoni's cut-out outside the stadium of last match?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.