Join us  

IND Vs WIN 2nd One Day : शतकानंतर विराटनं 'असं' का केलं; जाणून घ्या अर्थ

या सामन्यात शतक झळकावल्यावर कोहलीने एक खास अॅक्शन केली. या अॅक्शनचा अर्थ बऱ्याच जणांना त्यावेळी कळला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 7:09 PM

Open in App
ठळक मुद्देकोहलीने शतक झळकावल्यावर बॅट उंचावली. त्यानंतर त्याने आपल्या बॅटला हात लावला आणि हाताची मुठ दोनदा उघडली आणि बंद केली.

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठला. या सामन्यात कोहलीने नाबाद १५७ धावांची दमदार खेळी साकारली. या सामन्यात शतक झळकावल्यावर कोहलीने एक खास अॅक्शन केली. या अॅक्शनचा अर्थ बऱ्याच जणांना त्यावेळी कळला नव्हता.

हा पाहा व्हिडीओ

कोहलीने शतक झळकावल्यावर बॅट उंचावली. त्यानंतर त्याने आपल्या बॅटला हात लावला आणि हाताची मुठ दोनदा उघडली आणि बंद केली. त्यावेळी कोहलीला सांगायचे होते की, " मी नाही तर माझी बॅटच सारे काही बोलते." 

 

कोहलीने  वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. कोहलीने 9 हजार ते दहा हजार हा पल्ला फक्त अकरा डावांमध्ये गाठला आहे. कोहलीने दहा हजार धावांचा टप्पा 205 धावांमध्ये ओलांडत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकले आहे. सर्वात कमी डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याचा मान आता क्रिकेट विश्वामध्ये कोहलीने मिळवला आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज