Join us

IND vs WIN 1st T20 : कृणाल पांड्या 'KP' ला घाबरला, पण जिद्द सोडली नाही

IND vs WIN 1st T20: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्याली ट्वेंटी-20 सामन्यात कृणाल पांड्याने राष्ट्रीय संघात पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 19:59 IST

Open in App

कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्याली ट्वेंटी-20 सामन्यात कृणाल पांड्याने राष्ट्रीय संघात पदार्पण केले. भारताच्या प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावताना विंडीजचे तीन फलंदाज अवघ्या पाच षटकांत माघारी पाठवले. मात्र, ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट किरॉन पोलार्ड खेळपट्टीवर असल्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये धाकधुक होतीत. अशाच कर्णधार रोहित शर्माने चेंडू कृणालच्या हातात दिला.कृणाल आणि पोलार्ड हे इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात, रोहितही त्या संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याने कृणालला गोलंदाजीसाठी पाचारण केले, परंतु समोर पोलार्ड येताच कृणाल किंचितसा दबावात दिसला. त्याने पहिले दोन चेंडू Wide टाकले आणि तिसऱ्या चेंडूवर पोलार्डने खणखणीत षटकार खेचून त्याच्यावरील दबाव वाढवले. 

पण पुढच्याच षटकार कृणालने पोलार्डचा अडथळा दूर केला. रोहित शर्माने चाल यशस्वी झाल्याचा आनंद साजरा केला.

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजबीसीसीआय