Join us  

IND Vs WIN 1st One Day: भारताने विंडीजचा ८ गड्यांनी उडवला धुव्वा

‘हिटमॅन’ रोहित शर्माचे (१५२*) दमदार नाबाद दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे (१४०) आक्रमक शतक या जोरावर भारताने ३२३ धावांचे मोठे आव्हान अवघ्या ४२.१ षटकात २ फलंदाजांच्या मोबल्याद पार करुन वेस्ट इंडिजचा पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये ८ गड्यांनी धुव्वा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 3:36 AM

Open in App

गुवाहाटी : ‘हिटमॅन’ रोहित शर्माचे (१५२*) दमदार नाबाद दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे (१४०) आक्रमक शतक या जोरावर भारताने ३२३ धावांचे मोठे आव्हान अवघ्या ४२.१ षटकात २ फलंदाजांच्या मोबल्याद पार करुन वेस्ट इंडिजचा पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये ८ गड्यांनी धुव्वा उडवला. यासह पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. रोहित - कोहली यांच्या धडाक्यापुढे विंडीजच्या शिमरॉन हेटमायरची (१०६) शतकी खेळी व्यर्थ ठरली. कोहलीने ३६वे, तर रोहितने २०वे एकदिवसीय शतक ठोकले.बरसापरा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार कोहलीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरविताना विंडीजला सुरुवातीला ठराविक अंतराने धक्केही दिले. मात्र यानंतर हेटमायरने चौफेर फटकेबाजी करत केवळ ७८ चेंडूत ६ चौकार व ६ षटकारांसह १०६ धावांचा तडाखा दिला. याजोरावर विंडीजने निर्धारीत ५० षटकात ८ बाद ३२२ धावांची आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित - शिखर धवन यांनी सावध सुरुवात केली. धवनने एक चौकार मारत विंडीजला धोक्याचा इशाराही दिला. मात्र दुसऱ्याच षटकात ओशाने थॉमसच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होत त्याने तंबूची वाट धरली.यानंतर विंडीजचा आनंद फारवेळ टिकला नाही. रोहित - कोहली यांनी दुसºया गड्यासाठी २४६ धावांची जबरदस्त भागीदारी करत सामना विंडीजच्या हातून हिसकावून घेतला. कोहलीने १०७ चेंडूत २१ चौकार व २ षटकारांसह १४० धावांचा निर्णायक तडाखा दिला. रोहितनंतर खेळपट्टीवर आलेल्या कोहलीने सुरुवातीपासून फटकेबाजी करत भारताच्या धावसंख्येला कमालीचा वेग दिला. दुसºया बाजूने सावध खेळणाºया रोहितने ११७ चेंडूत १५ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १५२ धावा केल्या.तत्पूर्वी, हेटमायरच्या (१०६) शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने धावांचा डोंगर. डावखुºया हेटमायरने ७८ चेंडूमध्ये ६ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली. भारताकडून युझवेंद्र चहलने (३/४१) चांगला मारा केला. मोहम्मद शमी, खलील अहमद आणि चहल यांनी अनुक्रमे चंद्रपॉल हेमराज (९), किएरॉन पॉवेल (५१) आणि मार्लन सॅम्युअल्स (०) यांना बाद करुन विंडीजची १६व्या षटकात ३ बाद ८६ धावा अशी अवस्था केली. मात्र हेटमायरने विंडीजला मोठी धावसंख्या उभारून दिली. सलामीवीर पॉवेलनेही ३९ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह आक्रमक अर्धशतकी खेळी केली. यानंतर शाई होप (३२), कर्णधार जेसन होल्डर (३८), देवेंद्र बिशू (नाबाद २२), केमार रोच (२६*) व रोवमॅन पॉवेल (२२) यांनी छोटेखानी परंतु महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला तिनशेच्या पार नेले. हेटमायर बाद झाला तेव्हा विंडीजच्या ३८.४ षटकात ६ बाद २४८ धावा झाल्या होत्या. यावेळी भारत त्यांना तिनशेच्या आत रोखेल असे वाटत होते. मात्र, होल्डर, बिशू आणि रोच यांनी धावगती वाढवत संघाला आव्हानात्मक मजल मारुन दिली.युवा रिषभ पंतने विंडीजविरुद्ध भारताकडून पदार्पण केले. २४ वर्षांचा रिषभ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळणारा २२४वा भारतीय खेळाडू ठरला असून दिग्गज यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते त्याला संघाची कॅप प्रदान करण्यात आली.>कोहलीचा ‘विराट’ पराक्रमविराट कोहलीने या सामन्यात तुफानी खेळी करताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकत सर्वात कमी ३८६ डावांत ६० आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याचा पराक्रम केला, तर सचिनला ४२६ डावांमध्ये हा पल्ला गाठला होता. रोहितने या सामन्यात नाबाद दीडशतक झळकावताना सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक दीडशतकांचा विक्रम मोडला. सहाव्यांदा दीडशतक झळकावलेला रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक दीडशतक झळकावले असून सचिन व आॅस्टेÑलियाचा डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर प्रत्येकी ५ दीडशतकांची नोंद आहे. सुरुवतीला सावध फलंदाजी केलेल्या रोहितने शतक पूर्ण केल्यानंतर झंझावाती फटकेबाजी करत नाबाद दीडशतक ठोकले. भारत विजयापासून ५६ धावांनी दूर असताना कोहली बाद झाला. मात्र यानंतर रोहितने अंबाती रायुडूसह (२२*) भारताच्या विजयावर शिक्का मारला.कोहलीच्या नावावर आता ३६ एकदिवसीय आणि २४ कसोटी शतकांची नोंद असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६० शतके नोंदवणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुढे जॅक कॅलिस (६२), कुमार संगकारा (६३), रिकी पाँटींग (७१) आणि सचिन तेंडुलकर (१००) यांचा क्रमांक आहे.कोहलीने एकाच कॅलेंडर वर्षात २ हजार आंतरराष्ट्रीय धावा काढण्याचा पाचव्यांदा पराक्रम केला. सलग तीन कॅलेंडर वर्षात अशी कामगिरी करणारा कोहली तिसरा क्रिकेटपटू ठरला. कोहलीने अशी कामगिरी याआधी २०१२, २०१४, २०१६ व २०१७ साली केली आहे.>धावफलकवेस्ट इंडिज : किरन पॉवेल झे. धवन गो. अहमद ५१, चंद्रपॉल हेमराज त्रि.गो. शमी ०९, शाई होप झे. धोनी गो. शमी ३२, मार्लन सॅम्युअल्स पायचित गो. चहल ००, शिमरोन हेटमेयर झे. पंत गो. जडेजा १०६, रोवमॅन पॉवेल त्रि. गो. जडेजा २२, जेसन होल्डर त्रि. गो. चहल ३८, अ‍ॅश्ले नर्स पायचित गो. चहल ०२, दवेंद्र बिशू नाबाद २२, केमार रोच नाबाद २६. अवांतर (१४). एकूण ५० षटकांत ८ बाद ३२२.बाद क्रम : १-१९, २-८४, ३-८६, ४-११४, ५-१८८, ६-२४८, ७-२५२, ८-२७८.गोलंदाजी : मोहम्मद शमी १०-०-८१-२, उमेश यादव १०-०-६४-०, खलील अहमद १०-०-६४-१, युझवेंद्र चहल १०-०-४१-३, रवींद्र जडेजा १०-०-६६-२.भारत : रोहित शर्मा नाबाद १५२, शिखर धवन त्रि. गो. थॉमस ४, विराट कोहली यष्टीचीत होप गो. बिशू १४०, अंबाती रायुडू नाबाद २२. अवांतर - ८. एकूण : ४२.१ षटकात २ बाद ३२६ धावा.बाद क्रम : १-१०, २-२५६.गोलंदाजी : केमार रोच ७-०-५२-०; ओशाने थॉमस ९-०-८३-१; जेसन होल्डर ८-०-४५-०; अ‍ॅश्ले नर्स ७-०-६३-०; देवेंद्र बिशू १०-०-७२-१; चंद्रपॉल हेमराज १.१-०-९-०.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली