Join us  

IND vs WI : टीम इंडियाचा सामना करण्यासाठी विंडीजनं नेमले नवीन फलंदाज प्रशिक्षक

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 11:16 AM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी वेस्ट इंडिज संघानं नवीन फलंदाज प्रशिक्षक नेमला आहे. या प्रशिक्षकाकडे 12 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी अफगाणिस्तान, नेपाळ, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स यांच्यासह अन्य स्थानिक संघाला फलंदाज प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आव्हान असणार आहे.

माँटी देसाई असे या नव्या फलंदाज प्रशिक्षकाचं नाव आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं त्यांच्याशी दोन वर्षांचा करार केला आहे.  देसाई यांनी नुकतंच संयुक्त अरब अमिराती आणि कॅनडा या संघांच्या फलंदाज प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. ''जागतिक क्रिकेटमध्ये विक्रमी इतिहास लाभलेल्या संघासोबत काम करण्यासाठी मी आतुर आहे. या संघाच्या विजयात आपलाही हातभार लागेल, असा माझा प्रयत्न असेल,'' अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.  

वेस्ट इंडिज संघाचे प्रशिक्षक  सिमन्स यांनी सांगितले की,'' मी यापूर्वीही देसाईसोबत काम केले आहे. त्यानं त्याची गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याच्याकडे खूप अनुभव आहे. भारतीय खेळपट्टी समजून फलंदाजांना मार्गदर्शन करण्यात देसाईची आम्हाला मदत मिळेल.''  

वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 

वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स, विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिज