Join us  

IND vs WI : विराट कोहलीच्या नावावर 'हा' नवीन विक्रम

जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर कोहली ४५ धावांवर बाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 3:09 PM

Open in App
ठळक मुद्देकोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाच चौकारांच्या जोरावर ४५ धावा केल्या.

हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला मोठी खेळी साकारता आली नाही. पण तरीहीदेखील कोहलीने आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे.

या सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉने दमदार फलंदाजी करत ७० धावांची खेळी साकारली. त्यानंतर कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी दमदार भागीदारी रचली आणि त्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर कोहली ४५ धावांवर बाद झाला.

कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाच चौकारांच्या जोरावर ४५ धावा केल्या. या ४५ धावांसह कोहलीने आशिया खंडातील सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. कोहलीने एक कर्णधार म्हणून ४२ कसोटी सामन्यांमध्ये ४२३३ धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हकच्या नावावर होता. मिसबाहने कर्णधार म्हणून ५६ सामन्यांत ४२१४ धावा केल्या होत्या. क्रिकेट विश्वामध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. स्मिथच्या नावावर कर्णधार म्हणून ८६५९ धावा आहेत.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज