Join us  

Ind vs WI: वेस्ट इंडिजचा 'हा' स्फोटक फलंदाज भारताविरुद्ध खेळणार नाही

Ind vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमानांनी तीन दिवसांतच खिशात घातला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 4:11 PM

Open in App

नवी दिल्ली : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमानांनी तीन दिवसांतच खिशात घातला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यानंतर उभय संघांमध्ये वन डे व ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने सोमवारी संघ जाहीर केला. पण, या संघात एक नाव नसल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ख्रिस गेल वैयक्तिक कारणास्तव वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेत खेळणार नाही. वेस्ट इंडिजने या मालिकेसाठी संघात तीन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. संघाचे निवड समिती अध्यक्ष कर्टनी ब्राऊन यांनी सांगितले की,'' ख्रिस गेल भारत आणि बांगलादेश यांच्याविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही. या दौऱ्यासाठी तो उपलब्ध नाही. मात्र, मायदेशात होणाऱ्या मालिकेत आणि विश्वचषक  

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वन डे सामना 21 ऑक्टोबरला गुवाहाटी येथे होणार आहे. पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवताना विंडीजने संघात तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामध्ये फलंदाज चंद्रपाल हेमराज, अष्टपैलू खेळाडू फॅबियन अॅलेन आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस यांचा समावेश आहे. 

डॅरेन ब्राव्हो दोन वर्षांनंतर, तर कायरन पोलार्ड एका वर्षानंतर संघात पुनरागमन करणार आहे. यांच्यासह आंद्रे रसेलही संघात परतला आहे. दुखापतीमुळे रसेल वन डे मालिकेत खेळणार नाही. ड्वेन ब्राव्हो आणि फिरकीपटू सुनील नरीन यांना कोणत्याच संघात स्थान मिळालेले नाही. 

वन डे संघ : जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियन अॅलेन, सुनील अंबरीश, देवेंद्र बिशू, चंद्रपाल हेमराज, शिमरोन, शाय होप, अलजारी जोसेफ, एविन लुईस, अॅश्ले नर्स, कीमो पॉल, रोवमन पॉवेल, केमार रोच, मार्लोन सॅमुअल्स, ओशाने थॉमस 

ट्वेंटी-20 संघ: कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), फॅबियन अॅलेन, डॅरेन ब्राव्हो, शिमरोन, एविन लुईस, ओबेड मकाय, अॅश्ले नर्स, कीमो पॉल, खारी पियरे, कायरेन पोलार्ड, रोवमन पॉवेल, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, शेरफाने रुदरफोर्ड, ओशाने थॉमस.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज