Join us  

IND VS WI: अजब योगायोग... पहिल्याच सामन्यात पृथ्वीची दोन 'शॉ'नदार शतके

एकापेक्षा एक दमदार फटके आत्मविश्वासाने खेळत पृथ्वीने अवघ्या ९९ चेंडूत पहिलं कसोटी शतक साकारले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 4:01 PM

Open in App
ठळक मुद्दे... या सामन्याच्या दुसऱ्या डावात पृथ्वीने १२० धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबईला विजय मिळवता आला होता.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पहिल्या सामन्यात धडाकेबाज शतक झळकावत पृथ्वी शॉ अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला. पण पहिल्याच सामन्यात दुसरे शतक झळकावण्याचा अजब योगायोग पृथ्वीच्या बाबतीत पाहायला मिळाला.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत, एकापेक्षा एक दमदार फटके आत्मविश्वासाने खेळत पृथ्वीने अवघ्या ९९ चेंडूत पहिलं कसोटी शतक साकारलं. या कामगिरीमुळे १८ वर्षं ३२९ दिवस वयाचा युवा कसोटी शतकवीरांच्या यादीत सातव्या स्थानी विराजमान झाला आहे. १९वा वाढदिवस साजरा करण्याआधी कसोटी शतक साजरं करणारा तो, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे.

पृथ्वी १ जानेवारी २०१७ साली पहिला रणजी सामना खेळला. हा सामना तामिळनाडूविरुद्ध होता. या सामन्याच्या दुसऱ्या डावात पृथ्वीने १२० धावांची खेळी साकारल्यामुळे मुंबईला विजय मिळवता आला होता. पृथ्वीचा हा पहिला रणजी सामना राजकोटच्याच मैदानात झाला होता. त्यामुळे पृथ्वी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत असला तरी त्याचे या मैदानातील हे दुसरे शतक ठरले आहे.

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध वेस्ट इंडिज