IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन

कुलदीपशिवाय जड्डूनंही दाखवली फिरकीतील जादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:15 IST2025-10-12T13:11:54+5:302025-10-12T13:15:04+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd Test Kuldeep Yadav registered a brilliant five-wicket haul India enforce a follow on | IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन

IND vs WI : कुलदीपचा 'पंजा'! टीम इंडियानं पाहुण्या वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI , 2nd Test Day 3 India Enforced Follow On West Indies : कुलदीप यादवच्या फिरकीतील जादू अन् त्याला जड्डूनं दिलेली उत्तम साथ या जोरावर भारतीय संघाने दिल्ली कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्या डावात २४८ धावांवर रोखले आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ५१८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या तुलनेत बॅटिंगमध्ये मैदानात तग धरण्याची धमक दाखवली. पण शेवटी ते २७० धावांनी पिछाडीवर राहिले.  शुबमन गिलनं पाहुण्या संघाला फॉलोऑन देत पुन्हा एकदा संघाला बॅटिंगला बोलवले आहे. डावाने पराभव टाळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाला आधी २७० धावा कराव्या लागतील. इथं एक नजर टाकुयात याआधी भारतीय संघाने कॅरेबियन संघाला किती वेळा फॉलोऑन दिला अन् त्या सामन्याचा निकाल काय लागला यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वेस्ट इंडिजच्या संघाकडून तळाच्या फलंदाजीतील अँडरनस याने खेळले सर्वाधिक चेंडू

भारतीय संघाने दिलेल्या ५१८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने यावेळ बॅटिंगमध्ये पहिल्या सामन्याच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. पण तरीही त्यांना फॉलोऑनची नामुष्की काही टाळता आली नाही. वेस्ट इंडिज विरुद्धच्या संघाकडून पहिल्या डावात अलिक अथनाझे याने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. याशिवाय तळाच्या फलंदाजीत अँडरसन फिलिप याने सर्वाधिक ९७ चेंडू खेळत २४ धावा करत फॉलोऑन टाळण्यासाठी प्रयत्न केला. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. कुलदीप यादवच्या पाच विकेट्स शिवाय रवींद्र जडेजानं ३ तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. 

याआधी भारतीय संघानं कधी अन् कोणत्या मैदानावर वेस्ट इंडिजला दिला होता फॉलोऑन? निकाल काय लागला?

सामन्याची तारीखमैदानदेश (भारताची धावसंख्या)प्रतिस्पर्धी संघधावसंख्येतील फरकनिकाल
९ ऑक्टोबर २००२वानखेडे स्टेडियमभारत (४५७)वेस्ट इंडिज (१५७ आणि १८८)३००भारतानं डाव आणि ११२ धावांनी विजय मिळवला
१४ नोव्हेंबर २०११ईडन गार्डन्सभारत (७/६३१ डाव घोषित)वेस्ट इंडिज (१५३ आणि ४६३)४७८भारतानं डाव आणि १५ धावांनी विजय मिळवला
२१ जुलै २०१६सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमभारत (८/५६६ डाव घोषित)वेस्ट इंडिज (२४३ आणि २३१)३२३भारतानं डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला
४ ऑक्टोबर २०१८सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमभारत (९/६४९ डाव घोषित)वेस्ट इंडिज (१८१ आणि १९६)४६८भारतानं डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला
१० ऑक्टोबर २०२५अरुण जेटली स्टेडियमभारत (५१८/५ डाव घोषित)वेस्ट इंडिज (२४८ आणि ठरायचं आहे)२७०निकाल प्रतीक्षेत

Web Title : कुलदीप का पंजा: भारत ने वेस्टइंडीज को फॉलोऑन दिया

Web Summary : कुलदीप यादव की फिरकी से भारत ने वेस्टइंडीज को 248 पर रोका, भारत ने 518 रन बनाए। 270 रनों से पीछे वेस्टइंडीज को पारी की हार से बचने के लिए फॉलोऑन खेलने पर मजबूर किया गया।

Web Title : Kuldeep's five-wicket haul: India enforces follow-on against West Indies.

Web Summary : Kuldeep Yadav's spin helped India restrict West Indies to 248 after India scored 518. Trailing by 270 runs, West Indies were forced to follow-on by Shubman Gill to avoid an innings defeat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.