Join us  

Rishabh Pant, IND vs WI, 2nd ODI Live Updates: "हम अपनी मस्ती मै!", १८ धावांवर बाद झाल्यानंतर पाहा रिषभ पंत काय करत होता, मीम्स व्हायरल

IND vs WI, 2nd ODI Live Updates: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 4:15 PM

Open in App

IND vs WI, 2nd ODI Live Updates: भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल पाहायला मिळत आहे. टीम इंडियात लोकेश राहुलचे पुनरागमन झाल्यामुळे मागील सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या इशान किशनला बाकावर बसावे लागले. वेस्ट इंडिजचा कर्णधार  किरॉन पोलार्डलाही आजच्या सामन्याला मुकावे लागले.   किरॉन पोलार्डच्या अनुपस्थितित आज निकोलस पूरनने वेस्ट इंडिज संघाच्या नेतृत्वाची कमान सांभाळली. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि त्यात कर्णधार रोहित शर्माने मोठा डाव टाकला. लोकेश राहुलचे पुनरागमन होऊनही रोहितने सलामीला रिषभ पंतला उतरवले.  

पण, रोहित ५ धावांवर माघारी परतला आणि त्यापाठोपाठ रिषभ पंत ( १८) व विराट कोहली ( १८) एकाच षटकात बाद झाले. बाद झाल्यानंतर रिषभ सीमासेषेवर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफसमोर झोपलेला दिसला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि मीम्सही बनल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरिषभ पंत
Open in App