'यशस्वी' भव: २१ वर्षीय जैस्वालचे पदार्पणात शतक, मोडला ४९ वर्षांपूर्वीचा तगडा विक्रम

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर गिअर बदलला अन् वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 11:23 PM2023-07-13T23:23:18+5:302023-07-13T23:23:55+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 1st Test Live updates Marathi : HUNDRED FOR YASHASVI JAISWAL ON HIS TEST DEBUT;He scored 100* runs from 215 balls Break 49 years old record | 'यशस्वी' भव: २१ वर्षीय जैस्वालचे पदार्पणात शतक, मोडला ४९ वर्षांपूर्वीचा तगडा विक्रम

'यशस्वी' भव: २१ वर्षीय जैस्वालचे पदार्पणात शतक, मोडला ४९ वर्षांपूर्वीचा तगडा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st Test Live : यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर गिअर बदलला अन् वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. विंडीजच्या पहिल्या डावातील १५० धावांच्या प्रत्युत्तरात यशस्वी व रोहित या जोडीने १५०+ धावांची भागीदारी केली. भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येचा सलामीवीरांनी विकेट न टाकता प्रथमच आघाडी घेण्याचा विक्रम आज केला. या दोघांनी वेस्ट इंडिजमध्ये भारताकडून सर्वोत्तम सलामीच्या भागीदारीची नोंद केली. यशस्वीने आज शतकी खेळी करून पराक्रम केला. 

इतिहास घडला! यशस्वी जैस्वाल-रोहित शर्मा जोडीने १७ वर्षांपूर्वीचा दोन दिग्गजांचा विक्रम मोडला


विंडीजचा पहिला डाव १५० धावांत गडगडला. आर अश्विनने ( ५-६०), रवींद्र जडेजाने ३ तर मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. यशस्वी व रोहित या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांच्या अर्धशतकांनी अनेक विक्रम मोडले. १७ वर्षानंतर वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच भारतीय सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. लंच ब्रेकनंतर दोघांची खेळाची गती वाढवली अन् दीडशतकी भागीदारी पूर्ण केली. ऑक्टोबर २०१९नंतर प्रथमच भारताच्या सलामीवीरांनी १५०+ भागीदारी केली.  यशस्वी-रोहितने १६०वी धाव घेताच मोठा विक्रम नोंदवला गेला. वेस्ट इंडिजमध्ये १७ वर्षानंतर भारताकडून झालेली ही सलामीवीरांची सर्वोत्तम भागीदारी ठरली.   (IND vs WI 1st Test Live Scoreboard ) 


विंडीजच्या गोलंदाजांनी टाकलेल्या काही सुरेख चेंडूंवर दोघांचे झेल उडाले खरे, परंतु तेथे खेळाडूच उपलब्ध नव्हते.  आत्मविश्वास उंचावलेल्या यशस्वीची फटकेबाजी पाहण्यासारखी होती. यशस्वीने आज ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. परदेशात किंवा तटस्थ ठिकाणी भारतीय सलामीवीराने पदार्पणात सर्वोत्तम खेळीचा विक्रम यशस्वीने नावावर केला. त्याने सुधिर नाईक यांचा ७७ ( वि. इंग्लंड, १९७४) विक्रम मोडला. या विक्रमात मयांक अग्रवाल ( ७६ वि. ऑस्टेलिया, २०१८), सुनील गावस्कर ( ६७* वि. वेस्ट इंडिज, १९७१) यांचा विक्रम मोडला. यशस्वीने पदार्पणात शतक झळकावले आणि शिखर धवन व पृथ्वी शॉ यांच्यानंतर कसोटीत शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय ठरला. त्याने २१५ चेंडूंत ११ चौकारांसह शतक पूर्ण केले. 

 

Web Title: IND vs WI 1st Test Live updates Marathi : HUNDRED FOR YASHASVI JAISWAL ON HIS TEST DEBUT;He scored 100* runs from 215 balls Break 49 years old record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.