कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमानांनी विजय मिळवला. मात्र, 110 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला घाम गाळावा लागला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी केली. दिनेश कार्तिकने उपयुक्त खेळी करताना भारताला 5 विकेट राखून विजय मिळवून दिला.
- भारताचे शतक
- मनिष पांडेने विकेट फेकली
- ब्रेथवेटने लोकेश राहुलचाही अडथळा दूर केला
- कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने रिषभ पंतला माघारी पाठवले
- ओशाने थॉमसने शिखर धवनचा त्रिफळा उडवला
- धावांचा पाठलाग करताना भारताला पहिल्या षटकात धक्का बसला
कोलकाता : रोहित शर्माचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि वेस्ट इंडिज संघाला 109 धावांपर्यंतच मजल मारू दिली. कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजांनीही टिच्चून मारा केला.
खलीलने ट्वेंटी 20 पदार्पणातील पहिली विकेट घेतली
2018
कुलदीपला दुसरे यश
डॅरेन ब्राव्हो कुलदीपच्या फिरकीच्या जाळ्यात
पोलार्डला पांड्याने बाद केले
हेटमेयर बुमराच्या गोलंदाजीवर माघारी
शाय होप्स धावबाद
वेस्ट इंडिजचा सलामीवीर दिनेश रामदिन माघारी
भारतीय संघात दोन नवीन चेहरे, विंडीजला धक्का
पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यासाठी भारतीय संघात कृणाल पांड्या आणि खलील अहमद हे दोन नवीन चेहरे दिसणार आहे. खलीलने भारताच्या वन डे संघाचे प्रतिनिधित्व केले असले तरी ट्वेंटी-20 संघात तोही पदार्पण करणार आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा या सामन्यात खेळणार नाही.
कोलकाता :
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना इडन गार्डनवर खेळवण्यात येत आहे. कसोटी आणि वन डे मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-20 मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. मात्र, या फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिज संघाचे पारडे यजमानांपेक्षा वरचढ आहे. त्यात कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी यांची अनुपस्थिती भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.