IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स!

India vs Sri Lanka 2nd T20I : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 04:48 PM2021-07-27T16:48:07+5:302021-07-27T16:48:41+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd T20I : Krunal Pandya was found to be positive, Points from the BCCI statement; know Revised  SLvIND T20I Schedule  | IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स!

IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka 2nd T20I : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. बीसीसीआयनंही सोशल मीडियावरून याबाबतची माहिती जाहीर केली.  कृणाल पांड्या पहिल्या ट्वेंटी-20त खेळला होता आणि त्यानं 3 धावा व 1 विकेट घेतली होती. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू विलगिकरणात गेले आहेत. बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमच्या म्हणण्यानुसार टीम इंडियातील 8 खेळाडू कृणालच्या संपर्कात आले होते आणि त्यामुळे या आठही खेळाडूंवर टीम लक्ष ठेवून आहे.   

कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेत टीम इंडियाचे 8 खेळाडू; पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यांचा इंग्लंड दौरा संकटात

भारत-श्रीलंका यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज म्हणजेच 27 जुलैला होणार होता, परंतु कृणालचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोन्ही टीमचे खेळाडू विलगिकरणात आहेत. त्यामुळे ट्वेंटी-20 मालिकेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. ''मंगळवारी सकाळी सर्व खेळाडूंची Rapid Antigen Tests करण्यात आली आणि त्यात कृणालचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वैद्यकिय टीमनं कृणालच्या संपर्कात 8 खेळाडू आल्याचे सांगितले आहे आणि ते विलगिकरणात आहेत. त्यामुळे आता सर्वच खेळाडूंची RT-PCR टेस्ट होणार आहे. त्याचा रिपोर्ट लवकरच जाहीर केला जाईल,''असे बीसीसीआयनं ट्विट करून सांगितले. ( The entire contingent is undergoing RT-PCR tests today to ascertain any further outbreak in the squad)


भारत-श्रीलंका ट्वेंटी-20 मालिकेचे नवे वेळापत्रक ( The revised schedule )

  • दुसरा सामना - 28 जुलै, कोलंबो
  • तिसरा सामना - 29 जुलै, कोलंबो

 

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 
 

Web Title: IND vs SL, 2nd T20I : Krunal Pandya was found to be positive, Points from the BCCI statement; know Revised  SLvIND T20I Schedule 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.