IND vs SL 1st ODI: पहिल्याच चेंडूवर षटकार कसा मारला, इशान किशनने सामन्यानंतर उघड केलं गुपित 

IND vs SL 1st ODI: श्रीलंका दौऱ्यात काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 09:53 AM2021-07-19T09:53:49+5:302021-07-19T09:55:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL 1st ODI: How he hit a six off the first ball, Ishan Kishan revealed the secret after the match | IND vs SL 1st ODI: पहिल्याच चेंडूवर षटकार कसा मारला, इशान किशनने सामन्यानंतर उघड केलं गुपित 

IND vs SL 1st ODI: पहिल्याच चेंडूवर षटकार कसा मारला, इशान किशनने सामन्यानंतर उघड केलं गुपित 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो - भारताचा प्रमुख संघ सध्य इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा संघ मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला आहे. (IND vs SL 1st ODI) दरम्यान, या दौऱ्यात काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या विजयामध्ये कर्णधार शिखर धवनसोबत पृथ्वी शॉ आणि इशान किशन (Ishan Kishan) या युवा फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यातही इशान किशनने तुफानी फटकेबाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यातही एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर इशानने षटकार खेचत आश्चर्याचा धक्का दिला होता. आता या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्यामागचे गुपित इशान किशनने उघड केले आहे. (How he hit a six off the first ball, Ishan Kishan revealed the secret after the match)

पहिला एकदिवसीय सामना आटोपल्यानंतर फिरकीपटू युझवेंद्र चहल याने इशानची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये इशान म्हणाला की, समोर कुठलाही गोलंदाज असला तरी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकायचा हे मी आधीच ठरवून ठेवले होते. संघातील सहकाऱ्यांनाही मी माझा इरादा बोलून दाखवला होता. अखेर मी फलंदाजीस उतरल्यावर पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्यात यशस्वी ठरलो.

गोलंदाजीदरम्यान ५० षटके यष्टीरक्षण केल्यावर ही खेळपट्टी गोलंदाजांना फार मदत करणार नाही याची जाणीव मला झाली होती. त्यामुळेच समोर कुठलाही गोलंदाज असला तरी मी पहिल्या चेंडूवर षटकार मारणार असा इरादा मी बोलून दाखवला होता. तसा मी षटकार ठोकून दाखवला. विशेष बाब म्हणजे माझा वाढदिवस होता. त्याच दिवशी माझे पदार्पण झाले आणि आमचा संघ सामना जिंकला, असे इशान किशन म्हणाला.

काल श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात इशान किशनने झंझावाती अर्धशतकी खेळी केली. त्याने ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५९ धावा फटकावल्या. यादरम्यान, त्याने शिखर धवनसोबत ८५ धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केली. 

Web Title: IND vs SL 1st ODI: How he hit a six off the first ball, Ishan Kishan revealed the secret after the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.