दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये समोरासमोर आले की दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या अपेक्षा अधिक उंचावतात. हेच चित्र आशिया चषक स्पर्धेत पाहायला मिळत आहे. पण, भारताने दोन्ही सामन्यांत पाकिस्तानला पराभवाची धुळ चाखवली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तान संघ चांगलाच ट्रोल झाला आहे.
सलामीवीर शिखर धवन (११४ धावा, १०० चेंडू, १४ चौकार, २ षटकार) आणि रोहित शर्मा (नाबाद १११ धावा, ११९ चेंडू, ७ चौकार, ४ षटकार) यांनी वैयक्तिक शतके झळकावत केलेल्या २१० धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ९ गडी व ६३ चेंडू राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत विजय मोहीम कायम राखत जवळजवळ अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यानंतर सोशल मीडियावर विनोदाचा फड भरला आहे.