Join us  

IND Vs NZ : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का; केन विल्यमसन देणार राजीनामा?

या मालिकेपूर्वीच केन विल्यमसन राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 4:54 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला अजून सुरुवातही झाली नाही. पण या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण या मालिकेपूर्वीच केन विल्यमसन राजीनामा देणार असल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी झालेल्या मालिकेमध्ये विल्यमसनवर भरपूर टीका करण्यात आली होती. त्यामुळे आता भारतासारख्या दिग्गज संघाबरोबर होणाऱ्या सामन्यांसाठी आपण संघाचे नेतृत्व करू नये, असे विल्यमसनला वाटत आहे. त्यामुळे या मालिकेपूर्वी विल्यमसन कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

आतापर्यंत विल्यमसनच्या कप्तानीचे जगभरातून कौतुक करण्यात आले होते. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विल्यमसनने जो संयम दाखवला त्याचे कौतुक पूर्ण क्रिकेट विश्वाने केले होते. त्यामुळे विल्यमसनच्या नेतृत्वावर जजर टीका होत असेल, तर ती योग्य आहे, असा एक मतप्रवाह आहे.

कोणत्याही संघाचे नेतृत्व करणे सोपे नक्कीच नसते. दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करत तुम्हाला संघापुढे आदर्श निर्माण करायचा असतो. विल्यमसनने हे बऱ्याचदा करून दाखवले आहे. त्यामुळे जर विल्यमसनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला तर त्याच्याजागी संघाचे नेतृत्व करणार कोण, हा यक्षप्रश्न न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनापुढे असेल. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. पण या दौऱ्यापूर्वीच भारताचा कर्णधार विराट कोहलीची एक डोकेदुखी पुढे आली आहे. कोहलीलाही ही समस्या लपवून ठेवता आलेली नाही. कोहलीने ही समस्या आता सर्वांसमोर मांडली आहे.

या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याच्या जागी ट्वेंटी-20 संघात संजू सॅमसनचा, तर वन डे संघात पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं पहिल्या लढतीतील रणनीती स्पष्ट केली आहे. या सामन्यात अंतिम अकरा शिलेदार कसे असतील याची पुसट कल्पना दिली आहे.

पण कोहलीची डोकेदुखी ही संघ निवड नक्कीच नाही. कारण प्रत्येक सामन्यापूर्वी संघ निवडबाबत चर्चा केली जाते आणि एक व्यावसायिक क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून कोहलीसाठी ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे संघ निवड ही कोहलीसाठी डोकेदुखी नक्कीच नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिका संपली. त्यानंतर २-३ दिवसांमध्येच भारताला न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी रवाना व्हावे लागले. न्यूझीलंडमध्ये पोहोचल्यावरही भारतीय संघाला ३ दिवसांमध्येच पहिला सामना खेळावा लागत आहे.

याबाबत कोहली म्हणाला की, " तुम्ही जेव्हा एका दौऱ्यावर जाता तेव्हा तुम्हाला वातावरणाशी जुळवून घेणे महत्वाचे असते. पण जेव्हा एखाद्या दौऱ्यावर गेल्यावर तुम्हाला लगेचच क्रिकेट सामना खेळावा लागत असेल, तर ती डोकेदुखी ठरते. त्यामुळे या समस्येवर भविष्यात तोडगा नक्कीच काढला जावा." 

भारतीय संघानं 2020 सालाची दणक्यात सुरुवात केली. टीम इंडियानं श्रीलंकेला ट्वेंटी-20 मालिकेत ( 2-0) आणि ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत ( 2-1) पराभूत केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत यष्टिरक्षक रिषभ पंत याला दुखापत झाल्यानंतर सलामीवर रिषभ पंत यष्टिंमागे दिसला होता. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यावरही हेच चित्र पाहायला मिळेल का, याची उत्सुकता सर्वांना होती. यावर विराटनं स्पष्ट मत मांडलं.

टॅग्स :केन विलियम्सनभारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली