Join us  

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी भारताने केली ही गोष्ट, व्हिडीओ झाला वायरल

आता कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ पुन्हा एकदा सराव सोडून दुसरीकडे गेल्या पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 6:35 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये एक गोष्ट केली आहे. या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

वनडे मालिका गमावल्यावर भारतीय संघ भटकंतीला गेल होता. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्माही होती. या दोघांचे फोटो त्यावेळी चांगलेच वायरल झाले होते. आता कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ पुन्हा एकदा सराव सोडून दुसरीकडे गेल्या पाहायला मिळाले आहे.

यावेळी भारतीय संघाचा एक पेहराव पाहायला मिळाला. भारतीय संघाने पांढऱ्य रंगाचा शर्ट आणि त्यावर जॅकेट घातले होते. यावेळी विराट कोहलीने काही लोकांना संबोधित केल्याचेही पाहायला मिळाले. न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाने भारतीय उच्च आयुक्ताला भेट घेतली.

बायकोबरोबर वेळ व्यतित करण्यासाठी न्यूझीलंडच्या खेळाडूने कसोटी मालिकेतून घेतला ब्रेकभारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 आणि वन- डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारताने कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यातच आता न्यूझीलंडनेही कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. पण या संभाव्य संघातून एका खेळाडूने आपल्या बायकोला वेळ देण्यासाठी संघातून ब्रेक घेतला आहे.

न्यूझीलंडने जाहीर केलेल्या संघात सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टने पुनरागमन केले आहे. तसेच न्यूझीलंडने वेगवान गोलंदाज कायल जेमिन्सनला संधी दिली असून फिरकीपटू मिशेल सॅन्टनरला संघातून वगळण्यात आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 आणि वन- डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

न्यूझीलंडच्या संघातील नील वँगनरने बायकोला वेळ देण्यासाठी ब्रेक घेतला आहे. नीलची बायको पहिल्यांदाच गरोदर आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यावेळी आपण तिच्याजवळ असावे, असे नीलला वाटत आहे. त्यामुळे नीलने ही गोष्ट संघाला कळवली असून ब्रेक घेतला आहे. आता त्याच्याजागी मॅट हेनरीची निवड करण्यात येणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांचे संभाव्य संघ असे आहेत...

भारताचा कसोटी संघ: विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, नवदीप सैनी, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

न्यूझीलंडचा कसोटी संघ: केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, रॉस टेलर, कॉलिन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, निल वॅगनर, बीजे वॉलटिंग, मॅट हेनरी.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंड