Join us  

IND vs NZ, 3rd T20I Live Update : रोहित शर्मानं मोडला महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम; टीम इंडियानं उभा केला धावांचा डोंगर

India vs New Zealand, 3rd T20I Live Update : फुल टाईम कर्णधार म्हणून रोहित शर्मानं ( Rohit Sharma) पहिलीच ट्वेंटी-२० मालिका गाजवली. त्यानं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 8:51 PM

Open in App

India vs New Zealand, 3rd T20I Live Update : फुल टाईम कर्णधार म्हणून रोहित शर्मानं ( Rohit Sharma) पहिलीच ट्वेंटी-२० मालिका गाजवली. त्यानं स्वतः जबाबदारीनं खेळ करताना मालिकेत सर्वाधिक धावा कुटल्या, पण सहकाऱ्यांनाही प्रोत्साहन देत चांगली कामगिरी करून घेतली. रोहितनं तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत ५३च्या सरासरीनं १५९ धावा केल्या. त्यानं आजच्या लढतीत ३१ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली. त्याला इशान किशन, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल व दीपक चहर यांनी चांगली साथ दिली. भारतानं तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान उभं करण्यात यश मिळवलं. 

रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत टीम इंडियानं तिन्ही सामन्यात नाणेफेक जिंकली.  लोकेश राहुलला विश्रांती दिल्यानं रोहितसह इशान किशन सलामीला आला आणि दोघांनी इडन गार्डनवर धुरळा उडवला. या जोडीनं पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना ६९ धावा चोपल्या. रोहित व इशान यांनी मैदानाच्या कानाकोपऱ्याच चेंडू टोलवला. सातव्या षटकात ही जोडी तुटली. प्रभारी कर्णधार मिचेल सँटनरनं टीम इंडियाला पहिला धक्का देताना इशानला बाद केले. इशाननं २९ धावा केल्या. त्याच षटकात सूर्यकुमार यादवही ( ०) माघारी परतला. सँटनरनं त्याच्या पुढच्या षटकात रिषभ पंतलाही ( ४) माघारी पाठवून टीम इंडियाला तिसरा धक्का दिला.  पटापट तीन फलंदाज बाद झाल्यानं रोहितनंही सावध पवित्रा घेतला. भारताच्या १० षटकांत ३ बाद ९० धावा झाल्या होत्या. ७-१० षटकांत भारतानं २१ धावांत ३ फलंदाज गमावले. रोहितनं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. त्याचे हे ट्वेंटी-२०तील ३०वे अर्धशतक ठरले. पण, इश सोढीनं १२व्या षटकात भन्नाट रिटर्न कॅच घेताना रोहितचा झंझावात रोखला. हिटमॅन ३१ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६ धावा केल्या. वेंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर यांना आज मोठी खेळी करण्याची संधी होती. त्यांनी चांगली फटकेबाजीही केली, परंतु ट्रेंट बोल्टनं १५व्या षटकात वेंकटेशला ( २०) बाद केले. पुढच्याच षटकात अॅडम मिल्नेनं टीम इंडियाला सहावा धक्का देताना श्रेयसला ( २५) माघारी पाठवले.

अय्यर्स बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर अक्षर व हर्षल हे दोन पटेल उतरले. १९व्या षटकात हर्षननं खणखणीत षटकार मारला, परंतु पुढच्या चेंडूवर हिट विकेट होऊन बाद झाला. भारतान २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या. दीपक चहरनं अखेरच्या षटकात १९ धावा कुटल्या. 

रोहित शर्मानं मोडला महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम ( Most 50+ scores by Indians in international cricket) - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत रोहितनं माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकून आगेकूच केली. सचिन तेंडुंलकर ( २६४) या विक्रमात आघाडीवर आहे. त्यानंतर राहुल द्रविड ( १९३), विराट कोहली ( १८८), सौरव गांगुली ( १४४) , रोहित शर्मा ( १२४*) आणि महेंद्रसिंग धोनी ( १२३) असा क्रमांक येतो. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्मा
Open in App