Join us  

IND vs NZ, 2nd Test at Wankhede Stadium : भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी होणार वानखेडे स्टेडियमवर, जाणून घ्या काय सांगतेय आकडेवारी 

वानखेडे स्टेडियम वर २३ जाने १९७५ ला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर ०३ डिसें २०२१ ला होणारा न्यूझीलंड विरुध्दचा दुसरा सामना हा २६वा कसोटी सामना, तर एकूण ५५वा आंतरराष्ट्रीय सामना असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 3:47 PM

Open in App

 - सुबोध सुरेश वैद्य, स्कोअरर (गुणलेखक)IND vs NZ, 2nd Test at Wankhede Stadium : वानखेडे स्टेडियम वर २३ जाने १९७५ ला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर ०३ डिसें २०२१ ला होणारा न्यूझीलंड विरुध्दचा दुसरा सामना हा २६वा कसोटी सामना, तर एकूण ५५वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. आजपावेतो या मैदानात ५४ विविध आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले, ज्यात २५ कसोटी सामने, २२ मर्यादित षटकांचे एकदिवसीय सामने तर ७ टवेंटी-२० षटकांचे सामने झालेले आहेत. २२ मर्यादित षटकांच्या एकदिवसीय सामन्यात तीन विश्वचषकांतील ६ सामन्यांचा समावेश आहे. या मैदानावर शेवटचा कसोटी सामना डिसें २०१६ ला खेळवला गेला जो इंग्लिश संघाविरुध्द होता. कसोटी खेळणाऱ्या देशांपैकी बांगलादेश, झिम्बाब्वे व अफगाणिस्तान व्यतिरिक्त सर्व देश या मैदानावर खेळलेत.

  • कसोटी सामने - २५
  • भारत विजयी - ११
  • भारत पराजित - ७
  • अनिर्णित- ७  

 

विजय तालिकेत, डाव राखत मिळवलेले (ऑस्ट्रेलीया १९७९-८०, इंग्लंड १९९२-९३, वेस्टइंडीज २०१३-१४ व इंग्लंड २०१६-१७) तर इंग्लंड विरुध्द १९८४-८५ ला ८ गडी राखून मिळालेले विजय सुखकारक आहेत. पराभवांवर नजर टाकली असता, इंग्लंड (२००५-०६) विरूध्दचा (२१२ धावांनी) तर उदघाटनाचा वेस्टइंडीज बरोबर सामन्यांतला (२०१ धावांनी) तर दहा गडींनी (इंग्लंड १९८८-८९, ऑस्ट्रेलिया २०००-०१ आणि इंग्लंड २०१२-१३) पराभव जिव्हारी लागणारे होते.

न्यूझीलंड बरोबर भारत २ कसोटी सामने खेळला, पहिला नोव्हें १०, १९७६ ला तर दुसरा नोव्हें २४, १९८८. विजय-पराजय तालिकेत दोन्ही संघांनी एक-एक विजय मिळवला आहे.  

आकडेवारीवर नजर टाकता लक्षात येईल कि हे मैदान भारतीय संघासाठी व फलंदाजी साठी धार्जिण आहे. एकूण धावांच्या यादीत एकूण डावात ४८९.६४ च्या सरासरीने २४४८२ धावा नोंदवल्या गेल्यात. यातील भारताचा वाटा डावात ५०८. ९६ च्या सरासरीने १२७२४ धावा. २०११ नोव्हें ला झालेल्या वेस्टइंडीज विरूध्दच्या सामन्यात १४४८ धावांची लयलूट झाली. तसेच या मैदानावरची सामन्यातली एकूण किमान धावसंख्या ६०५ आहे, ऑस्ट्रेलिया विरुध्द नोव्हें २००४ नोंदवली गेली.  डावात धावांचा उचांक  

इंग्लंड (६३१) ने २०१६ साली नोंदवला. तर डावात धावांचा निचांक (९३) भारताच्या (आस्ट्रेलीया, २००४) नावावर आहे. 

या मैदानावर एकूण ४० शतके तटवली गेली आहेत, भारतीयांची २४ तर दौऱ्यावर आलेल्यांची १६. सुनील गावस्कर ५ शतकांसह अग्रस्थानी आहेत, तर वर्तमान खेळाडू चेतेश्वर पुजाराने २ शतके ठोकली. मैदानावरची फलंदाजांची कारकीर्द पाहता सुनील गावस्कर ११२२ धावांनी सर्वोच्च स्थानी तर सचिन तेंडुलकर ९२१ धांवानी दुसऱ्या स्थानी आहे. कारकीर्द  वर्तमान खेळाडू विराट कोहली ४३३ धावा जमवून सातव्या स्थानी आहे.ह्या मैदानावर एकूण ८१५ बळी घेतले गेलेले आहेत. तर सात वेळा दोनही संघ दोनदा म्हणजे सर्व ४० गडी बाद  झालेत. कारकिर्दीत सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (३८) यांनी टिपलेत. तर पाठोपाठ वर्तमान खेळाडू अश्विन ३० बळींसह दुसऱ्या स्थानी आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडमुंबईसुनील गावसकरचेतेश्वर पुजारा
Open in App