Join us  

IND vs NZ, 2nd Test Live Update : खेळपट्टीची पाहणी झाली, नाणेफेकीची वेळ ठरली; एकही चेंडू न फेकता लंच ब्रेकची घोषणा झाली

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीला सुरू होण्यास आणखी वेळ लागणार आहे. मॅच रेफरी आणि इतर सदस्यांनी तिसऱ्यांदा खेळपट्टीची पाहणी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 10:43 AM

Open in App

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीला सुरू होण्यास आणखी वेळ लागणार आहे. मॅच रेफरी आणि इतर सदस्यांनी तिसऱ्यांदा खेळपट्टीची पाहणी केली आहे. १०.३० वाजता केलेल्या पाहणीनंतर अखेर सामना सुरू होण्यास हिरवा कंदील मिळाला आहे आणि नाणेफेकीचीही वेळ ठरली. दरम्यान, आजच्या सामन्यात  टीम इंडियाच्या ताफ्यातून अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane), इशांत शर्मा ( Ishant Sharma) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. बीसीसीआयनं दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार ११.३० वाजता नाणेफेक होणार आहे आणि १२ वाजता खेळ सुरू होणार आहे. पहिले सत्र वाया गेल्यामुळे आज केवळ ७८ षटकं फेकली जाणार असल्याचे बीसीसीआयनं जाहीर केले.   जलदगती गोलंदाज इशांत शर्मा याच्या डाव्या हाताच्या करंगळीला कानपूर कसोटीच्या अखेरच्या दिवशी दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता. बीसीसीआयची वैद्यकिय टीम त्याच्यावर उपचार करत आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्याही उजव्या हाताला दुखापत झाली आहे आणि त्याच्या हाताला सूज आली आहे त्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला दिला गेला असून तोही मुंबई कसोटीत खेळणार नाही.  उपकर्णधार अजिंक्य रहाणे यालाही पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आणि त्यानंही या सामन्यातून माघार घेतली आहे.   

भारताचे तीन खेळाडू दुखापतीमुळे माघारी परतले असताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( captain Kane Williamson) यानंही आजच्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. केन मागील बरेच महिने डाव्या कोपऱ्याच्या दुखापतीशी झगडत आहे. मुंबई कसोटीपूर्वीही या दुखापतीनं डोकं वर काढलं आणि त्यानं माघार घेतली, असे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले.     

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडबीसीसीआयमुंबई
Open in App