Join us  

IND vs NZ, 1st T20I Live : पहिले अर्धशतक हाँगकाँगकडून अन् दुसरे न्यूझीलंडकडून; मार्क चॅपमॅनचा वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडियाच्या गोलंदाजांचे झाले हाल

India vs New Zealand 1st T20I Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपविजेत्या न्यूझीलंड संघानं कर्णधार केन विलियम्सन याच्या अनुपस्थितीतही सुरेख खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 8:50 PM

Open in App

India vs New Zealand 1st T20I Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपविजेत्या न्यूझीलंड संघानं कर्णधार केन विलियम्सन याच्या अनुपस्थितीतही सुरेख खेळ केला. मार्क चॅपमॅन ( Mark Chapman)  व मार्टीन गुप्तील ( Martin Guptill ) यांची शतकी भागीदारी आणि वैयक्तिक अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांची वाईट अवस्था केली. या सामन्यात चॅपमॅननं वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. दोन देशांकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला. भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना न्यूझीलंडनं तगडं आव्हान उभं केलं आहे.

फुल  टाईम कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून ३ जलदगती गोलंदाज, २ फिरकीपटू व ६ फलंदाज या रणनितीनं मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता नाइट रायडर्ससाठी आयपीएल २०२१चे दुसरे पर्व गाजवणाऱ्या वेंकटेश अय्यरनं ( Venkatesh Iyer) आजच्या सामन्यातून टीम इंडियाकडून पदार्पण केलं. रोहितनं आऊट ऑफ फॉर्म असलेल्या भुवनेश्वर कुमारवर विश्वास दाखवताना त्याच्याजोडीला दीपक चहर व मोहम्मद सिराज यांची निवड केली. भुवीनं पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरील मिचेल ( ०) याचा त्रिफळा उडवला. पण, हाँगकाँगकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आणि आता न्यूझीलंड संघाचा सदस्य असलेल्या मार्क चॅपमॅननं चांगली फटकेबाजी करताना किवींना पॉवरप्लेमध्ये १ बाद ४१ धावा उभारून दिल्या. चहरनं टाकलेल्या ६व्या षटकात त्यानं मार्टीन गुप्तीलच्या साथीनं १५ धावा जोडल्या.

पहिल्या षटकात विकेट मिळवूनही भारतीय संघाला सामन्यावर मजबूत पकड घेता आली नाही. चॅपमॅन व गुप्तील यांनी दमदार खेळ करताना भारताच्या गोलंदाजांना टार्गेट केले. चहर, सिराज, आर अश्विन व अक्षर पटेल यांना चॅपमॅननं कुटून काढले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.  जोखीमभऱ्या फटक्यांसह या दोघांनी गॅपमध्येही सुरेख फटके खेचून धावा जोडल्या. चॅपमॅननं न्यूझीलंडकडून पहिले अर्धशतक झळकावले. १४व्या षटकात अश्विननं ही भागीदारी संपुष्टात आणली. चॅपमॅन ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ६३ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्याच षटकात ग्लेन फिलिप्सलाही ( ०) अश्विननं पायचीत केलं. यावेळी फिलिप्सनं घेतलेला DRS वाया गेला. अश्विननं त्याच्या वाट्याच्या चार षटकांत २३ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

गुप्तीनं १५व्या षटकात सिराजला खणखणीत षटकार खेचताना अर्धशतक पूर्ण केलं. गुप्तील वादळी खेळी करत होता. १८व्या षटकात त्यानं चहरनं टाकलेला चेंडू ९८ मीटर लांब भिरकावला. पुढचा चेंडूही तसाच टोलवण्याच्या प्रयत्नात गुप्तील झेलबाद झाला. त्यानं ४२ चेंडूंत ३ चौकार ४ षटकारासह ७० धावा केल्या. चहरनं ४ षटकांत सर्वाधिक ४२ धावा देत १ विकेट घेतली. न्यूझीलंडनं २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. सिराजनंही ४ षटकांत ३९ धावा देत १ विकेट घेतली.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडभुवनेश्वर कुमारमोहम्मद सिराज
Open in App