Join us  

IND vs NZ 1st T20I Live : न्यूझीलंडने दर्जेदार खेळ केला, MS Dhoniच्या घरच्या मैदानावर भारत हरला; वॉशिंग्टनची 'सुंदर' कामगिरी

India vs New Zealand 1st T20I Live : न्यूझीलंड संघाने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:31 PM

Open in App

India vs New Zealand 1st T20I Live : न्यूझीलंड संघाने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अर्शदीप सिंगने २०व्या षटकात दिलेल्या २७ धावांनी न्यूझीलंडचा आत्मविश्वास  उंचावला. त्यानंतर पाहुण्यांच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना तालावर नाचवले. ३ फलंदाज १५ धावांवर माघारी परतले होते  आणि सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांनी सामन्यात पकड घेतली होती. पण, ४ चेंडूंनी सामना फिरला अन् त्यानंतर भारताचा डाव गडगडला. वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्ससह अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केला.

डॅरील मिचेल आणि डेव्हॉन कॉनवे या जोडीने भारताच्या गोलंदाजांची धुलाई केली. मिचेलने अखेरच्या षटकांत चांगले फटके मारले. अर्शदीप सिंगने टाकलेल्या २०व्या षटकात त्याने २७ धावा चोपल्या. फिन ॲलन ( ३५) आणि कॉनवे यांनी आक्रमक सुरुवात केली होती. कॉनवे व ग्लेन फिलिप्स यांची ६० धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने एका षटकात दोन धक्के देत भारताला कमबॅक करून दिले होते. कॉनवे ५२ धावांवर बाद झाला. सुंदरने ४-०-२२-२  आणि कुलदीपने ४-०-२०-१ अशी कामगिरी केली. अर्शदीपच्या २०व्या षटकात मिचेलेने २७ धावा चोपून न्यूझीलंडला ६ बाद १७६ धावा उभ्या करून दिल्या. मिचेल ५९ धावांवर नाबाद राहिला.  लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज १५ धावांवर माघारी परतले. सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांनी संघर्ष दाखवला.  फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारविरुद्ध सँटनरने निर्धाव षटक टाकून सर्वांना अचंबित केले. सूर्याने १२व्या षटकात इश सोढीच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला. पण, पुढच्याच षटकात सोढीने त्याला माघारी पाठवले. सूर्या  ३४ चेंडूंत ४७ धावा करून माघारी परतला. मायकेल ब्रेसवेलने पुढच्या षटकात हार्दिकला ( २१) चूक करण्यास भाग पाडले अन् उत्तुंग उडालेला चेंडू ब्रेसवेलनेच झेलला. वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडा यांना न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडून जीवदान दिले. पण, दीपकने ( १०) दबावात आपली विकेट टाकली.

 

 

मिचेल सँटनरने ४-१-११-२ व मायकेल ब्रेसवेलने ४-०-३२-२ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. भारताचे विकेट पडण्याचे सत्र सुरूच राहिले. २४ चेंडूंत ६२ धावांची गरज असताना शिवम मावी रन आऊट झाला. लॉकी फर्ग्युसनने १८वे षटकात विकेट मेडन ( कुलदीपची विकेट) टाकले. ट्वेंटी-२० कारकीर्दितील हे त्याचे पहिले निर्धाव षटक ठरले. १२ चेंडूत भारताल ५० धावा करायच्या होत्या. सुंदर चांगली फटकेबाजी करत होता आणि त्याने १९व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर १४ धावा चोपल्या. सुंदरने २५ चेंडूंत त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. सुंदर २८ चेंडूंत ५० धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडने २१ धावांनी सामना जिंकला. भारताला ९ बाद १५५ धावा करता आल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडवॉशिंग्टन सुंदर
Open in App