Join us  

India VS New Zealand, 1st T20 : पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय

India VS New Zealand, 1st T20 : प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतापुढे २०४ धावांचे आव्हान ठेवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 3:41 PM

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतापुढे २०४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने रोहित शर्माला झटपट गमावले. पण त्यानंतर मात्र लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी ९९ धावांची भागीदारी रचली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. राहुलने यावेळी ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर कोहली जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. कोहलीला यावेळी अर्धशतकासाठी पाच धावा कमी पडल्या. हे दोघे बाद झाल्यावर भारत हा सामना जिंकणार की नाही, असे वाटत होते. पण त्यानंतर श्रेयस अय्यरने तुफानी अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पहिल्याच ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडला भारतापुढे २०४ धावांचे आव्हान ठेवता आले.

 

पहिल्या सामन्यात फलंदाजी करत असताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी यावेळी अर्धशतकी भागीदारी रचली. न्यूझीलंडला यावेळी मार्टीन गप्तीलच्या रुपात पहिला धक्का बसला. गप्तीलचचा अप्रतिम झेल यावेळी रोहितने घेतल्याचे पाहायला मिळाले.

रोहि सीमारेषेवर उभा होता. त्यावेळी त्याने झेल पकडण्याा प्रयत्न केला. यावेळी आपला पाय सीमारेषेला लागेल, असे रोहितला वाटले. त्यामुळे त्याने चेंडू हवेत उडवला आणि त्यानंतर झेल पकडला. यानंतर तिसऱ्या पंचांनी रोहितचा पाय सीमारेषेला लागला आहे की नाही, हे पाहिले आणि त्यानंतर गप्तील आऊट असल्याचा निर्णय दिला.

गप्तिल बाद झाला असला तरी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी सुरुच ठेवली. कॉलिन मुनरोने यावेळी भारताच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५९ धावांची खेळी साकारली. मुनरोबरोबर कन विल्यमसननेही अर्धशतक पूर्ण केले, त्याने २४ चेंडूंत प्रत्येकी चार चौकार आणि षटकारांच्या जोरावर ५१ धावांची खेळी साकारली.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीलोकेश राहुलरोहित शर्मा