Join us  

Ind vs NZ, 1st T20 : ... अन् रिषभ पंतचे नाव विसरला विराट कोहली, झाली मोठी फजिती

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यापूर्वी फजिती झाल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:55 PM

Open in App
ठळक मुद्देनेमकं घडलं तरी काय...

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा कर्णधार विराट कोहलीची न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यापूर्वी फजिती झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कोहली पंतचे नाव घ्यायलाच विसरला.

नेमकं घडलं तरी काय...कोहली हा नाणेफेकीसाठी मैदानात आला. बऱ्याचदा नाणेफेकीचा कौल हा कोहलीच्या बाजूने लागत नाही, पण या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यावर समालोचकाने कोहलीला बोलावले. नाणेफेक जिंकल्यावर तुम्ही काय स्वीकारणार आहात, असा प्रश्न त्याने कोहलीला विचारला. यावेळी आम्ही गोलंदाजी स्वीकारत आहोत, असे कोहलीने स्पष्ट केले.

नाणेफेकीच्या निर्णयानंतर समालोचकाने कोहलीला आज कोणते खेळाडू खेळणार आहेत, असा प्रश्न विचारला. यावर कोहलीने जे खेळाडू खेळणार नाहीत त्यांची नावे घ्यायला सुरुवात केली. यावेळी कोहलीने कुलदीप यादव, नवदीप सैनी आणि संजू सॅमसन यांची नावे घेतली. पण त्यानंतर अन्य दोन खेळाडूंची नावे कोहलीला आठवत नव्हती. त्यामुळे त्याची फजिती झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ते दोन खेळाडू होते रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्यामुळे या सामन्यात लोकेश राहुलकडेच यष्टीरक्षणाचीच जबाबदारी असेल. भारताच्या संघात शिवम दुबेला संधी देण्यात आली आहे.

असा आहे भारताचा संघ

असा आहे न्यूझीलंडचा संघ

टॅग्स :विराट कोहलीरिषभ पंतभारत विरुद्ध न्यूझीलंड