Join us  

IND vs ENG : ३३ अन् ३ चं गणित जमलं तर धोनी बसणार दिग्गजांच्या पंक्तीत

आजपासून भारत आणि इंग्लंडविरोधात तीन सामन्याच्या वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 11:15 AM

Open in App

नॉटिंघम - तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत साहेबांना धूळ चारल्यानंतर आजपासून विराटसेना इंग्लंडविरोधात नव्या आव्हानाला सामोर जाणार आहे. आजपासून भारत आणि इंग्लंडविरोधात तीन सामन्याच्या वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत माजी कर्णधार धोनीला तीन विक्रमाला गवसणी घालण्याची संधी असणार आहे. 

महेंद्रसिंग धोनीला या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ 33 धावांची गरज आहे. अशी कामगिरी करणारा तो जागातील 12वा फलंदाज ठरेल. दहा हजार धावा पूर्ण करणारा भारताकडून चौथा खेळाडू ठरणार आहे. याआधी सचिन, सौरव आणि द्रविडने ही कामगिरी केली आहे. जर आज होणाऱ्या सामन्यात धोनीला फलंदाजीची संधी मिळाली आणि धोनीने 33 धावा केल्यास तो दिग्गजांच्या पंक्तीत बसेल. माजी कर्णधार धोनीने 318 वन-डे सामन्यात 9967 धावा केल्या आहेत. धोनीशिवाय या मालिकेत दहा हजार धावा पुर्ण करण्याची विराटकडेही संधी आहे. विराट कोहलीला दहा हजार धावा करण्यासाठी 412 धावांची गरज आहे. विराट कोहलीच्या नावावर 208 सामन्यात 9588 धावा आहेत. 

आतापर्यंत एमएस धोनीने 318 सामन्यात यष्टीमागे 404 फलंदाजांना बाद केले आहे. यामध्ये 107 स्टपिंग आणि 297 झेल घेतले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात धोनीने यष्टीमागे तीन झेल घेतल्यास त्याचे 300 झेल होतील. जर त्याचे 300 झेल झाले तर तो अॅडम गिलख्रिस्ट(417), मार्क बाउचर(402) आणि कुमार संगाकारा(383) यांच्या पंक्तित जाऊन बसेल.

 वन-डेमध्ये इंग्लंडविरोधात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची धोनीकडे संधी असणार आहे. हा विक्रम युवराजसिंगच्या नावावर आहे. युवराजने इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक 1523 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 1455 धावांसह सचिन तेंडुलकर आहे. तर स्थानावर माजी कर्णधार धोनी आहे. या दोघांचा विक्रम मोडण्यासाठी धोनीला 98 धावांची गरज आहे. या मालिकेत धोनीने 98 धावा केल्यास  इंग्लंडविरुद्ध वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडएम. एस. धोनीसचिन तेंडूलकरविराट कोहली