त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव

माजी क्रिकेटरनं केला दावा, बुमराहविरुद्ध इंग्लंडच्या ताफ्यात शिजलेला 'घातक' प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:32 IST2025-07-17T15:26:16+5:302025-07-17T15:32:31+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Mohammad Kaif Claimed Ben Stokes And Jofra Archer Planned To Injure Jasprit Bumrah At Lords Test | त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव

त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत-इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर या सामन्यात १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना जसप्रीत बुमराहनं कमालीचं धैर्य दाखवलं. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

माजी क्रिकेटरनं केला दावा, बुमराहविरुद्ध इंग्लंडच्या ताफ्यात शिजलेला घातक प्लॅन

तो ज्यावेळी मैदानात तग धरून बॅटिंग करत होता, त्यावेळी इंग्लंडच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चर अन् बेन स्टोक्सनं त्याला जायबंदी करण्याचा प्लॅन आखला होता, असा दावा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनं केला आहे. एका बाजूला बुमराह चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार का? हा मुद्दा चर्चेत असताना कैफनं केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर 

IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा

नेमकं काय म्हणाला माजी क्रिकेटर?

मोहम्मद कैफ याने आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीतील वेगवेगळ्या मुद्यावर मत मांडले आहे. आपल्या खास शोमध्ये तो म्हणाला की, जसप्रीत बुमराह मैदानात तग धरून उभा राहिल्यावर इंग्लंडच्या ताफ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर दोघांनी बुमराह विरुद्ध बाउन्सरचा मारा केला. तो आउट होत नसेल, तर बाउन्सरचा मारा करत बोट आणि खांद्याला दुखापत करायचा प्लॅनच, या दोघांनी आखला होता, असे कैफनं म्हटलं आहे.

बुमराहची जबरदस्त बॅटिंग

गोलंदाजीत विकेट्सची गॅरेंटी असणाऱ्या जसप्रीत बुमराहनं लॉर्ड्स कसोटी सामन्यात कमालीची फलंदाजी केली. आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने सर्वाधिक वेळ मैदानात तग धरून बॅटिंग केली. ५४ चेंडूत ५ धावा केल्या होत्या. बेन स्टोक्सनेच बुमराहच्या रुपात टीम इंडियाला नववा धक्का दिला होता.

बुमराह मँचेस्टरच्या मैदानातील कसोटीत दिसणार?

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होण्याआधीच बुमराह या दौऱ्यात फक्त ३ कसोटी सामने खेळणार, असे स्पष्ट करण्यात आले होते. पहिल्या ३ सामन्यातील २ सामने खेळल्यावर तो मँचेस्टरच्या मैदानात रंगणाऱ्या चौथ्या कसोटी सामना खेळणार की, पाचव्या सामन्यात दिसणार? अशी चर्चा रंगत आहे. भारताचे माजी कोच अन् फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी बुमराहानं दोन्ही कसोटी सामने खेळावे, असे मत व्यक्त केले आहे.
 

Web Title: IND vs ENG Mohammad Kaif Claimed Ben Stokes And Jofra Archer Planned To Injure Jasprit Bumrah At Lords Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.