IND vs ENG : 1 In, 1 Out! रांची कसोटीत भारतीय संघात बदल, प्रमुख खेळाडूंची अदलाबदल 

India vs England 4rth Test : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:38 AM2024-02-19T11:38:18+5:302024-02-19T11:39:36+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG : Jasprit Bumrah set to be rested for Ranchi Test, KL Rahul to be available for the 4th test | IND vs ENG : 1 In, 1 Out! रांची कसोटीत भारतीय संघात बदल, प्रमुख खेळाडूंची अदलाबदल 

IND vs ENG : 1 In, 1 Out! रांची कसोटीत भारतीय संघात बदल, प्रमुख खेळाडूंची अदलाबदल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4rth Test : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. हैदराबाद येथील कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाने पुढील दोन कसोटीत जबरदस्त कमबॅक केले. २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघात काही बदल पाहायला मिळणार आहेत. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते, तर लोकेश राहुल पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

राहुलला दुखापत झाल्याने तो तिसरी कसोटी खेळेल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. अशा स्थितीत तो रांची कसोटीत उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. भारतीय संघ मंगळवारी राजकोटहून रांचीच्या दिशेने रवाना होणार आहे, परंतु बुमराह संघासोबत प्रवास करणार नाही. तो तिथून अहमदाबादला जाणार आहे. वर्क लोड लक्षात घेता बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. बुमराह या मालिकेत सर्वाधिक १७ विकेट्स घेणारा गोलंदाज आहे आणि त्याने तीन सामन्यांत ८०.५ षटकं फेकली आहेत. त्यामुळे पाचव्या कसोटीपूर्वी त्याला विश्रांती दिली जाणार आहे.


मोहम्मद सिराजलाही दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिली गेली होती. तिसऱ्या कसोटीपूर्वी मुकेश कुमारला रणजी करंडक स्पर्धेचा सामना खेळण्यासाठी रिलीज केले गेले होते आणि तो रांची येथे टीम इंडियाच्या ताफ्यात पुन्हा दाखल होईल. भारतीय संघात २७ वर्षी जलदगती गोलंदाज आकाश दीपही आहे.

 

भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल , रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप    
 

Web Title: IND vs ENG : Jasprit Bumrah set to be rested for Ranchi Test, KL Rahul to be available for the 4th test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.