Join us  

Ind vs Eng: दिवस-रात्र कसोटीसाठी भारतीय संघात होणार फेरबदल, या खेळाडूंना मिळू शकते संधी

india vs england 3rd test : अहमदाबादमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर आणि दिवस-रात्र असा खेळ होणार असल्याने भारतीय संघात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळलेल्या काही खेळाडूंना या सामन्यातून वगण्यात येणार आहे. 

By बाळकृष्ण परब | Published: February 22, 2021 12:10 PM

Open in App
ठळक मुद्देचेन्नईतील दुसरा सामना फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळला गेला होताआता अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र सामन्यात वेगवान गोलंदाजीला मदत मिळण्याची शक्यता आहेत्यामुळे गोलंदाजीच्या फळीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे

अहमदाबाद - दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघ (Indian Cricket Team) आता अहमदाबादमधील मोटेरा येथे होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. (india vs england 3rd test ) या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर आणि दिवस-रात्र असा खेळ होणार असल्याने भारतीय संघात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळलेल्या काही खेळाडूंना या सामन्यातून वगण्यात येणार आहे. (Jaspreet Bumrah, Hardik Pandya to return to Indian squad for day-night Tests against England)अहमदाबादमध्ये खेळवली जाणारी दिवस-रात्र कसोटी हा भारतीय संघाचा तिसरा दिवस-रात्र सामना असेल. या सामन्यासाठी सलामीची जबाबदारी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर असेल. शुभमन गिल हा दुसऱ्या कसोटीत अपयशी ठरला होता. आता या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तर मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि विराट कोहली यांच्यावर जबाबदारी असेल. यष्टीरक्षणाची जाबाबदारी रिषभ पंतवर असेल.

 चेन्नईतील दुसरा सामना फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर खेळला गेला होता. मात्र आता अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या दिवस-रात्र सामन्यात वेगवान गोलंदाजीला मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोलंदाजीच्या फळीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. या सामन्यासाठी आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे संघातील पुनरागमन निश्चित आहे. मोहम्मद सिराजच्या जागी त्याचा संघात समावेश होईल. त्यामुळे या सामन्यात इशांत आणि बुमराहची जोडी खेळताना दिसेल.  दरम्यान, या सामन्यात कुलदीप जाधवच्या जागी अष्टपैली हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर अक्षर पटेलने दुसऱ्या कसोटीत जबरदस्त कामगिरी केल्याने त्याचे संघातील स्थान पक्के आहे. रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलवर फिरकी गोलंदाजीची मदार असेल.  असा असू शकतो तिसऱ्या कसोटीसाठीचा भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), अजिक्य रहाणे (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहहार्दिक पांड्या