Ind Vs Eng test Match live : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या विकेटनंतर भारताला दोन धक्के बसले. रवींद्र जडेजाला जीवदान मिळाले आहे आणि आता त्याच्यावरच इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभं करण्याची जबाबदारी आहे. पुजारा व रिषभ यांच्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे भारताने तीनशेपार आघाडी नेली आहे. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ( mohammad azharuddin ) यानं भविष्यवाणी केली आहे. भारतीय संघानं इतक्या धावांचं लक्ष्य ठेवले, तर इंग्लंडचा पराभव पक्का असा दावा त्याने केला आहे.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. १३२ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल ( ४), हनुमा विहारी ( ११) व विराट कोहली (२०) माघारी परतले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी ७८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभनेही ८६ चेंडूंत ५७ धावा केल्या.
श्रेयस अय्यर ( १९) पुन्हा अपयशी ठरला. त्याला बाद करण्यासाठी मॅक्युलमने गोलंदाजांना शॉर्ट बॉल टाकण्याचा इशारा केला होता आणि त्यानुसार पॉट्सने गोलंदाजी केली व जेम्स अँडरसनने सोपा झेल घेतला. शार्दूल ठाकूर ४ धावांवर माघारी परतला. चौथ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा भारताच्या ७ बाद २२९ धावा झाल्या असून ३६१ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. पण, अझरुद्दीनच्या मते भारताने ४२५ धावांची आघाडी घ्यायला हवी.
इंग्लडमध्ये १८८०नंतर ३५०+ धावांच्या लक्ष्याचा केवळ दोनवेळा यशस्वी पाठलाग झाला आहे. ऑस्ट्रेलियाने १९४८मधये ३ बाद ४०४ आणि इंग्लंडने २०१९मध्ये ९ बाद ३६२ धावांचे लक्ष्य पार केले.