० धावेत ३ बळी! कुलदीप यादवचा पंजा; १०० वर्षांच्या इतिहासात असा विक्रम जो कुणालाच नव्हता जमला 

कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav ) इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:45 PM2024-03-07T13:45:15+5:302024-03-07T13:47:54+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Live Update Day 1 Marathi : Kuldeep Yadav claims his 50th Test wicket, he took Five-wicket, England 175 for 6. | ० धावेत ३ बळी! कुलदीप यादवचा पंजा; १०० वर्षांच्या इतिहासात असा विक्रम जो कुणालाच नव्हता जमला 

० धावेत ३ बळी! कुलदीप यादवचा पंजा; १०० वर्षांच्या इतिहासात असा विक्रम जो कुणालाच नव्हता जमला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test Live update : कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav ) इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले. झॅक क्रॉलीच्या दमदार ७९ धावांच्या खेळीनंतर इंग्लंडचा डाव गडगडला. कुलदीपने ५ विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या ३ विकेट्स तर एकही धावांची भर न घातला पडल्या आणि त्यांची अवस्था ६ बाद १७५ अशी झाली आहे. जॉनी बेअरस्टोच्या विकेटसह कुलदीपने कसोटी क्रिकेटमधील त्याची पन्नासावी विकेट पूर्ण केली. 


कुलदीपने त्याच्या पहिल्याच षटकात बेन डकेटला ( २७) माघारी पाठवले. शुबमन गिलने अप्रतिम झेल पकडला. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात कुलदीपने दुसरा धक्का देताना ऑली पोपला ( १४) यष्टिचीत केले.  झॅक क्रॉली टीम इंडियाचे टेंशन वाढवले होते आणि २६व्या षटकात कुलदीपच्या चेंडूवर क्रॉलीचा शॉर्ट लेगला सर्फराज खानने भन्नाट झेल घेतला होता. पण, DRS न घेतल्याने त्याला जीवदान मिळाले.  जो रूट व क्रॉली यांनी संयमी खेळताना ७१ चेंडूंत ३७ धावा जोडल्या होत्या. कुलदीपने ही जोडी तोडली आणि चेंडू अप्रतिमरित्या वळवून क्रॉलीचा त्रिफळा उडवला. क्रॉलीने १०८ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ७९ धावा केल्या. पुन्हा एकदा त्याला शतकापासून वंचित रहावे लागले. 


शंभरावी कसोटी खेळणारा जॉनी बेअरस्टो मैदानावर आला आणि रवींद्र जडेजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याचे २ झेल टाकले. बेअरस्टोने दोन उत्तुंग षटकार खेचून गोलंदाजांवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला. पण, कुलदीपच्या गुगलीने पुन्हा कमाल केली आणि ६,२ असे फटके मारल्यानंतर बेअरस्टोला तिसऱ्या चेंडूवर फसवले. बॅटची किनार लागून चेंडू यष्टिरक्षक जुरेलच्या हाती विसावला आणि जोरदार अपील झाले. बेअरस्टो १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २९ धावांवर माघारी परतल्याने इंग्लंडला १७५ धावांवर चौथा धक्का दिला. त्यांनतर रवींद्र जडेजाने २६ धावांवर खेळणाऱ्या जो रुटला पायचीत पकडले. पुढच्या षटकात कुलदीपने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ( ०) याला पायचीत करून डावातील ५ विकेट्स पूर्ण केल्या. 

मागील १०० वर्षांच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूंत ( १८७१) कसोटीत ५० विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा भारताचा वेगवान आणि जगातील वेगवान फिरकीपटू ठरला.  

Web Title: IND vs ENG 5th Test Live Update Day 1 Marathi : Kuldeep Yadav claims his 50th Test wicket, he took Five-wicket, England 175 for 6.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.