Join us  

आर अश्विन, जॉनी बेअरस्टो यांचे कसोटींचे शतक! भारतीय संघात युवा फलंदाजाचे पदार्पण, २ बदल

India vs England 5th Test Live update : भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी आजपासून सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 9:05 AM

Open in App

India vs England 5th Test Live update : भारत-इंग्लंड यांच्यातल्या मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी आजपासून सुरू होत आहे. धर्मशाला येथे भारताचा आर अश्विन ( R Ashwin ) आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांनी कसोटीचे शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात हे दुसऱ्यांदाच घडले आहे, जेव्हा दोन विरोधी संघातील खेळाडू एकत्र १०० कसोटी खेळण्याचा विक्रम करतील. यापूर्वी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस व शॉन पोलॉक आणि न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग यांनी १०० वा कसोटी सामना एकत्र खेळला होता.

इंग्लंडच्या बेअरस्टोला स्पेशल १०० कसोटी कॅप दिली गेली . यावेळी त्याची आई जॅनेत, बहिण बेकी आणि पत्नी मीगन व मुलगा उपस्थित होते. भारताकडून देवदत्त पडिक्कलला आज पदार्पणाची कॅप दिली गेली. या मालिकेत सर्फराज खान, रजत पाटीदार, आकाश दीप आणि ध्रुव जुरेल यांच्यानंतर पड्डिकल हा कसोटी पदार्पण करणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला. रजत व आकाश दीप यांच्या जागी आज जसप्रीत बुमराह व पड्डिकल यांना संधी मिळाली आहे. 

भारताचा संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आऱ अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

इंग्लंडचा संघ - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनदेवदत्त पडिक्कल