Join us  

Jasprit Bumrah, IND vs ENG 5th Test : Boom Boom Bumrah! फलंदाजीत वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर जसप्रीत बुमराहने उडवला इंग्लंडच्या ओपनरचा त्रिफळा, Video 

India vs England 5th Test : कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत जसप्रीत बुमराहचा ( Jasprit Bumrah) वेगळाच अवतार पाहायला मिळाला. 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बुमराहने 16 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 5:00 PM

Open in App

India vs England 5th Test : कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत जसप्रीत बुमराहचा ( Jasprit Bumrah) वेगळाच अवतार पाहायला मिळाला. 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बुमराहने 16 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या. स्टुअर्ट ब्रॉडच्या ( Stuart Broad) एका षटकात त्याने 29 धावा चोपून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ब्रॉडच्या त्या षटकात 4 5wd 6nb 4 4 4 6 1 अशा एकूण 35 धावा आल्या आणि कसोटीतील हे सर्वात महागडे षटक ठरले. फलंदाजीत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवणाऱ्या जसप्रीतने इंग्लंडला तिसऱ्याच षटकात मोठा धक्का दिला. त्याने टाकलेल्या भन्नाट चेंडूवर अॅलेक्स लीसचा त्रिफळा उडाला. इंग्लंडने 16 धावांवर पहिली विकेट गमावली अन् पावसाची एन्ट्री झाली. 

Video : जसप्रीत बुमराहची 'युवी' स्टाईल फटकेबाजी, कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

   रिषभ पंत ( 146) व रवींद्र जडेजा यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात 416 धावांपर्यंत मजल मारली. जडेजा 194 चेंडूंत 13 चौकारांसह 104 धावांवर बाद झाला. 5 बाद 98 अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला रिषभ व जडेजा ही जोडी धावून आली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 222 धावांची विक्रमी भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले. पण, खरी फटकेबाजी कर्णधार जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) केली. त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या ( Stuart Broad) एका षटकात 29 धावा चोपल्या आणि कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. ब्रॉडच्या त्या षटकात एकूण 35 धावा आल्या आणि कसोटी क्रिकेटमधील ते सर्वात महागडे षटक ठरले. जेम्स अँडरसनने 60 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या. 

84व्या षटकात जसप्रीतने कहर केला. ब्रॉडच्या त्या षटकात 4,4Wd,6Nb,4,4,4,6,1 अशा एकूण 35 धावा आल्या. कसोटी क्रिकेटमधील हे सर्वात महागडे षटक ठरले. जसप्रीतची फटकेबाजी पाहून ब्रॉडला 2007 साली युवराज सिंगने दिलेला झटका आठवला असेल. युवीने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मध्ये सहा षटकार खेचून 36 धावा चोपल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 16 धावांवर पहिला धक्का बसला..   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहरिषभ पंतस्टुअर्ट ब्रॉडरवींद्र जडेजा
Open in App