Ravindra Jadeja, IND vs ENG 5th Test : 92 धावांवर झेल सुटला अन् पुढच्याच चेंडूवर रवींद्र जडेजाचे शतक, भारत मजबूत स्थितीत

India vs England 5th Test : रिषभ पंतच्या साथीने टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरणाऱ्या रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 03:32 PM2022-07-02T15:32:04+5:302022-07-02T15:32:56+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test : A magnificent Test match 100 for Ravindra Jadeja, India 7/371 | Ravindra Jadeja, IND vs ENG 5th Test : 92 धावांवर झेल सुटला अन् पुढच्याच चेंडूवर रवींद्र जडेजाचे शतक, भारत मजबूत स्थितीत

Ravindra Jadeja, IND vs ENG 5th Test : 92 धावांवर झेल सुटला अन् पुढच्याच चेंडूवर रवींद्र जडेजाचे शतक, भारत मजबूत स्थितीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test : रिषभ पंतच्या साथीने टीम इंडियाचा गडगडलेला डाव सावरणाऱ्या रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शतक पूर्ण केले. मोहम्मद शमीनेही सुरेख फटके मारताना त्याला  चांगली साथ दिली. 92 धावांवर असताना जडेजाचा दुसऱ्या स्लिपमध्ये झेल सुटला अन् तो चेंडू चौकार गेला. त्यानंतर आणखी एक चौकार मारून त्याने शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटीतील तिसरे शतक अन् इंग्लंडविरुद्धचे पहिलेच शतक ठरले. भारताने 7 बाद 371 धावांपर्यंत मजल मारली आहे. 

रिषभ पंतने भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी धुमाकुळच घातला... ट्वेंटी-20 मालिकेत थंड पडलेली रिषभची बॅट कसोटीत तळपली अन् त्याच्या 146 धावांच्या स्फोटक खेळीने सारे चित्र बदलले. भारताची अवस्था 5 बाद 98 अशी झाली होत, परंतु रिषभ व रवींद्र जडेजा यांच्या 222 धावांच्या विक्रमी भागीदारीने भारताला 7 बाद 338 धावांपर्यंत मजल मारून दिली. रिषभ-जडेजाच्या या खेळीने अनेक विक्रम मोडले गेले.  


रिषभ पंतने 89 चेंडूंत हे शतक पूर्ण केले. इंग्लंडमध्ये भारताकडून हे दुसरे जलद शतक ठरले. यापूर्वी 1990मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने लॉर्ड्स कसोटीत 87 चेंडूंत शतक झळकावले होते. रिषभने 111 चेंडूंत 146 धावा केल्या आणि त्याचा स्ट्राईक रेट हा 131.53 इतका होता. स्ट्राईक रेटनुसार भारताकडून ही दुसरी जलद सेंच्युरी ठरली. 1996मध्ये कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अझरुद्दीनने 141.55च्या स्ट्राईक रेटने 77 चेंडूंत 109 धावा केल्या होत्या.   

Web Title: IND vs ENG 5th Test : A magnificent Test match 100 for Ravindra Jadeja, India 7/371

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.