Join us  

IND vs ENG, 5th T20 : लोकेश राहुलला डच्चू द्या, मुंबई इंडियन्सच्या आणखी एका खेळाडूला खेळवा - मायकेल वॉन 

IND vs ENG, 5th T20 : सध्याच्या घडीला KL Rahulमध्ये तो आत्मविश्वास दिसत नाही. तो संघर्ष करतोय, असे वॉन म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 3:53 PM

Open in App
ठळक मुद्देलोकेश राहुलनं चार सामन्यांत १, ०, ० व १४ अशा धावा केल्या आहेतटीम इंडियाच्या अंतिम ११मध्ये मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे वर्चस्व

Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सलामीला तीन वेगवेगळी जोडी मैदानावर उतरवली. पण, त्यात लोकेश राहुलला ( KL Rahul) कायम ठेवताना सहकारी फलंदाज बदलला. मालिकेतील चारही सामन्यात खेळण्याची संधी मिळूनही लोकेश राहुलला साजेशी कामगिरी करता आली नाही. लोकेश राहुलनं चार सामन्यांत १, ०, ० व १४ अशा धावा केल्या आहेत. मालिकेतील निर्णायक सामन्यात लोकेश राहुलला डच्चू देऊन मुंबई इंडियन्सच्या आणखी एका खेळाडूला खेळवा, असा सल्ला इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) यानं दिला आहे. फॉर्मात असलेल्या इशान किशनला आजही बाकावर बसवणार, लोकेश राहुलला आणखी एक संधी मिळणार?

पाचव्या सामन्यात लोकेश राहुलला अंतिम ११मध्ये संधी देऊ नये, अशी मागणी मायकेल वॉननं केली आहे. भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोमहर्षक विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-२अशी बरोबरी मिळवली. आज होणाऱ्या पाचव्या व अंतिम सामन्यात मालिकेचा निकाल आपल्या बाजूनं लावण्याच्या निर्धारानं भारत-इंग्लंड दोन्ही संघ मैदानावर उतरतील.  इंग्लंड प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करतील, याची शक्यता कमी आहे, परंतु टीम इंडियाला अंतिम ११मध्ये काही बदल करावे लागतील. सलामीवीर लोकेश राहुल ( KL Rahul) याचे अपयश हे संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात पराभवानंतर इंग्लंडच्या संघाला आणखी एक धक्का!

वॉन म्हणाला,''लोकेश राहुल अपयशी ठरत आहे आणि त्याला आज अंतिम ११मध्ये संधी मिळणार नाही. त्याच्या जागी इशान किशनला सलामीला खेळवा. त्याचा आत्मविश्वास बरंच काही सांगून जातो. त्यानं पदार्पणाच्या सामन्यात दमदार खेळ केला. लोकेश राहुलला कायमचं संघाबाहेर बसवा, असं म्हणणं नाही. पण, सध्याच्या घडीला त्यात तो आत्मविश्वास दिसत नाही. तो संघर्ष करतोय. आजच्या सामन्यात इशान व रोहित सलामीला खेळतील. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा आणखी एक खेळाडू घेऊन मैदानावर उतरा.''  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडलोकेश राहुलइशान किशन