Join us  

IND vs ENG 5th T20 : विराट कोहली भडकला, वाद घालण्यासाठी जोस बटलरच्या दिशेनं सुसाट सुटला, Video 

India vs England, 5th T20I : १३व्या षटकात भुवनेश्वर कुमारनं इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्यानं जोस बटलरला ( Jos Buttler) माघारी पाठवले आणि पेव्हेलियनमध्ये जात असताना बटलर व कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यांच्यात जे घडले त्यानं वातावरण तापले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:14 PM

Open in App

IND vs ENG 5th T20 : पहिल्याच षटकात विकेट गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ सहज हार मानेल असे वाटले होते, परंतु जोस बटलर व डेवीड मलान यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी करून टीम इंडियाचं टेंशन वाढवलं. १५व्या षटकात शार्दूल ठाकूरनं दोन विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर जाण्यास भाग पाडले. तत्पूर्वी १३व्या षटकात भुवनेश्वर कुमारनं इंग्लंडला मोठा धक्का दिला. त्यानं जोस बटलरला ( Jos Buttler) माघारी पाठवले आणि पेव्हेलियनमध्ये जात असताना बटलर व कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. विराट वाद घालण्यासाठी बटलरच्या दिशेनं सुसाट सुटला.. त्यानंतर विराटनं मैदानावरील पंचांकडे तक्रार केली. Ind Vs Eng 5th T20, Ind Vs Eng 5th T20 Live Score

दुसऱ्याच चेंडूवर विकेट, तरीही इंग्लंडची गाडी सुसाट...लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारनं धक्का दिला.  भुवीनं सलामीवीर जेसन रॉयचा त्रिफळा उडवला. पण, जोस बटलर ( Jos Buttler ) व डेवीड मलान ( Dawid Malan) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तिसऱ्या ट्वेंटी-२०त बटलरनं नाबाद ८३ धावा करताना भारताला पराभूत केलं होतं. मालिकेत आतापर्यंत फार चांगली कामगिरी करू न शकलेला जागतिक क्रमवारीतील अव्वल फलंदाज मलाननं दमदार खेळ केला. १३व्या षटकात ही भागीदारी तुटली. या दोघांनी ८२ चेंडूंत १३० धावांची भागीदारी केली. भुवीनं जोस बटलरला ( ५२) बाद केले. Ind Vs Eng T20 Match Today, Ind Vs Eng 5th T20 Live Match

डेवीड मलानला वर्ल्ड रेकॉर्ड अन् शार्दूल ठाकूरचे धक्केट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा विक्रम डेवीड मलाननं नावावर केला. त्यानं २४ डावांत हा पराक्रम करताना बाबर आझम ( २६ डाव) व विराट कोहली ( २७) यांचा विक्रम मोडला. ( Dawid Malan becomes the quickest batsman to complete 1000 T20I run) १५व्या षटकात शार्दूल ठाकूरनं सामन्याला कलाटणी दिली. त्यानं जॉनी बेअरस्टो ( ७) व मलान य़ांना बाद केले. मलान ४६ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ६८ धावा करून माघारी परतला. १ बाद १३० धावांवरून इंग्लंडचा डाव ८ बाद १८८ असा गडगडला.  

भारतानं जिंकली मालिकाभारतानं २० षटकांत २ बाद २२४ धावा चोपून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. जोस बटलर ( Jos Buttler ) व डेवीड मलान ( Dawid Malan) यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारतीय संघाचं टेंशन वाढवलं होतं, परंतु शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) मॅजिकल ओव्हर टाकली आणि टीम इंडियानं सामन्याला कलाटणी दिली. इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १८८ धावाच करता आल्या आणि टीम इंडियानं हा सामना ३६  धावांनी जिंकून मालिका ३-२ अशी खिशात घातली. 

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीशार्दुल ठाकूरभुवनेश्वर कुमार