Join us

IND vs ENG, 4th Test : बेन स्टोक्सनं वचपा काढला; विराट कोहलीच्या नावे लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला, Video

IND vs ENG, 4th Test : Virat Kohli out for duck बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) अप्रतिम बाऊन्सर टाकून विराट ( Virat Kohli) ला बाद केलं आणि तेही भोपळ्यावर...

By स्वदेश घाणेकर | Updated: March 5, 2021 12:32 IST

Open in App

India vs England, 4th Test : इंग्लंडच्या पहिल्या डावातील २०५ धावांचा पाठलाग करणारी टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाचे तीन शिलेदार माघारी परतले आहेत. रोहित शर्मा ( Rohit Sharma) एकटा खिंड लढवत आहे. चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे झटपट माघारी परतले. बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) अप्रतिम बाऊन्सर टाकून विराट ( Virat Kohli) ला बाद केलं आणि तेही भोपळ्यावर... सामन्याच्या पहिल्या दिवशी विराटसोबत झालेल्या वादाचा स्टोक्सनं असा वचपा काढला. दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाची अवस्था ४ बाद ८५ अशी झाली आहे. Rohit Sharma; रोहित शर्माच्या डोक्यावर आदळला चेंडू; अम्पायर्सनी तातडीनं बोलावली मदत

१ बाद २४ धावांवरून सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी ४० धावांवर दुसरा धक्का बसला. जॅक लिचनं टीम इंडियाच्या पुजाराला ( १७) पायचीत केलं. मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरोधात DRS घेतला गेला, परंतु तिसऱ्या पंचांनीही निर्णय कायम राखला. त्यानंतर आलेल्या विराटला ८व्या चेंडूवर बेन स्टोक्सनं झेलबाद करून माघारी पाठवले. विराटला भोपळाही फोडता आला नाही. अजिंक्य चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु तोही २७ धावांवर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ind vs eng 4th test cricket 2021 Narendra Modi Stadium live score  या अल्लाह, आमच्या PSLला कुणाची नजर लागली; पाकिस्तानी खेळाडूच्या ट्विटनंतर भारतीयांनी घेतली शाळा 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक भोपळ्यावर बाद होणारे भारतीय कर्णधार विराट कोहली  - १३सौरव गांगुली - १३ महेंद्रसिंग धोनी - ११कपिल देव - १०

विराट कोहली एकाच मालिकेत दोनवेळा बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर तो दोनवेळा शून्यावर बाद झाला होता. रोहित शर्माचा मोठा पराक्रम, जगातील एकाही ओपनरला आतापर्यंत जमला नाही हा विक्रम!

कसोटीत सर्वाधिक शून्यावर बाद होणारे भारतीय कर्णधारविराट कोहली - ८महेंद्रसिंग धोनी - ८ सध्याच्या भारतीय संघातील सर्वाधिक शून्यावर बाद होणारे खेळाडूइशांत शर्मा - ३२विराट कोहली - १२जसप्रीत बुमराह -  ९

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीबेन स्टोक्समहेंद्रसिंग धोनीरोहित शर्मा