IND vs ENG, 4th Test : Rohit Sharma; रोहित शर्माच्या डोक्यावर आदळला चेंडू; अम्पायर्सनी तातडीनं बोलावली मदत

IND vs ENG, 4th Test : Ben Stokes bouncer hit on Rohit Sharma Helmet स्टोक्सनं टाकलेल्या बाऊन्सरवर पुल शॉट मारण्याचा रोहितचा प्रयत्न फसला. त्यानंतर मैदानावरील अम्पायर्सनी त्वरीत टीम इंडियाच्या फिजिओला बोलावले.

By स्वदेश घाणेकर | Published: March 5, 2021 11:34 AM2021-03-05T11:34:32+5:302021-03-05T11:34:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 4th Test : Ben Stokes bouncer hit on Rohit Sharma Helmet | IND vs ENG, 4th Test : Rohit Sharma; रोहित शर्माच्या डोक्यावर आदळला चेंडू; अम्पायर्सनी तातडीनं बोलावली मदत

IND vs ENG, 4th Test : Rohit Sharma; रोहित शर्माच्या डोक्यावर आदळला चेंडू; अम्पायर्सनी तातडीनं बोलावली मदत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अहमदाबाद ( Ahmedabad Test) कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय चाहत्यांचा टेंशन वाढवणारा प्रसंग घडला. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या हेल्मेटवर जोरदार चेंडू आदळला. भारताच्या ३१व्या षटकात हा प्रसंग घडला. बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) टाकलेल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्माच्या हेल्मेटवर चेंडू आदळला. त्यानंतर स्टेडियमर उपस्थित प्रेक्षकांना धडकी भरली. स्टोक्सनं टाकलेल्या बाऊन्सरवर पुल शॉट मारण्याचा रोहितचा प्रयत्न फसला. त्यानंतर मैदानावरील अम्पायर्सनी त्वरीत टीम इंडियाच्या फिजिओला बोलावले. रोहित शर्माचा मोठा पराक्रम, जगातील एकाही ओपनरला आतापर्यंत जमला नाही हा विक्रम!

फिजिओनं येऊन रोहितशी चर्चा केली आणि त्यानंतर तो खेळण्यास तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले. रोहितनेही त्यानंतर चांगली खेळी करताना भारताचा डाव सावरला आहे. चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा व विराट कोहली एकमागोमाग माघारी परतले. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही रोहित व अजिंक्य रहाणेवर आहे.  PSL 2021 Postponed : या अल्लाह, आमच्या PSLला कुणाची नजर लागली; पाकिस्तानी खेळाडूच्या ट्विटनंतर भारतीयांनी घेतली शाळा  

 
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर ( Most runs in WTC Among Openers) 
रोहित शर्मा - १०००*
डेव्हिड वॉर्नर -  ९४८
डिन एल्गर - ८४८ 
डॉम सिब्ली - ८४१  
मयांक अग्रवाल - ८१०

अजिंक्य रहाणेनं ( १०६८) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना WTCमध्ये १००० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला होता. मार्नस लाबुशेन ( १६७५), जो रूट ( १६३०), स्टीव्ह स्मिथ ( १३४१), बेन स्टोक्स ( १३३२) हे फलंदाज आघाडीवर आहेत. India vs England 4th test cricket  
ind vs eng, ind vs eng 4th test इंग्लंड पुन्हा अडकला फिरकीच्या जाळ्यात 

अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन जोडीच्या फिरकी जाळ्यात पाहुणा संघ पुन्हा अडकला. चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव पहिल्या दिवशी चहापानानंतर २०५ धावांत संपुष्टात आला.  गेल्या कसोटीत ११ बळी घेणारा स्थानिक स्टार अक्षरने ६८ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले, तर अश्विनने ४७ धावांत तीन बळी घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन फलंदाजांना माघारी परतवले. बेन स्टोक्सचा (५५) अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
 

Web Title: IND vs ENG, 4th Test : Ben Stokes bouncer hit on Rohit Sharma Helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.