Join us  

IND vs ENG, 4th Test : रोहित शर्मा OUT झाल्यावरून सुरू झालाय वाद; चाहत्यांची ICCला लक्ष घालण्याची मागणी 

IND vs ENG, 4th Test : Rohit Sharma Umpires call रोहितनं १४४ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावा केल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: March 05, 2021 3:25 PM

Open in App

India vs England, 4th Test : इंग्लंडच्या संघानं चौथ्या कसोटीच्या ( Ahmedabad Test) दुसऱअया दिवशी चांगले कमबॅक केले. रोहित शर्मानं ( Rohit Sharma) दमदार खेळ करताना भारताची खिंड लढवली होती, परंतु ४९ धावांवर तो दुर्दैवीरित्या बाद झाला. बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) त्याला पायचीत केलं. मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरोधात रोहितनं DRS घेतला, परंतु Umpires Call कायम ठेवल्यानं त्याला माघारी परतावे लागले. रोहितला नाबाद द्यायला हवं होतं, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं व्यक्त केलं. चाहत्यांनी तर umpires call rule कडे आयसीसीनं लक्ष घालावं अशी मागणी केली. Ind vs Eng live test score from Narendra Modi Stadium कोण होणार जसप्रीत बुमराहची नवरी?; टीम इंडियाचा गोलंदाज महाराष्ट्राचा जावई बनणार की साऊथचा?

आकाश चोप्रा काय म्हणालाइम्पॅक्ट - अम्पायर्स कॉलहिटींग दी स्टम्प्स - अम्पायर्स कॉलहा नाबाद निर्णय असायला हवा होता  १ बाद २४ धावांवरून सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी ४० धावांवर दुसरा धक्का बसला. जॅक लिचनं टीम इंडियाच्या पुजाराला ( १७) पायचीत केलं. मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरोधात DRS घेतला गेला, परंतु तिसऱ्या पंचांनीही निर्णय कायम राखला. त्यानंतर आलेल्या विराटला ८व्या चेंडूवर बेन स्टोक्सनं झेलबाद करून माघारी पाठवले. विराटला भोपळाही फोडता आला नाही. अजिंक्य चांगल्या फॉर्मात दिसत होता, परंतु तोही २७ धावांवर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ind vs eng 4th test cricket 2021 Narendra Modi Stadium live score   NZ vs AUS : 2,6,6,6,0,6 : विराट कोहलीच्या माजी खेळाडूनं १५ कोटींच्या नव्या भिडूला धु धु धुतले, नोंदवला रेकॉर्ड, Video

रोहितनं यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याच्यासह संघाची खिंड लढवली. पण, रोहित बाद झाल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडेल असे वाटले होते. बने स्टोक्सनं त्याला ५०व्या षटकात पायचीत केले. रोहितनं १४४ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावा केल्या. आर अश्विनही १३ धावांवर बाद झाला. मात्र, रिषभनं कसोटीतील ७वे अर्धशतक झळकावताना इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. IPL 2021 Dates : टीम इंडिया जागतिक कसोटीच्या अंतिम सामन्यात खेळल्यास BCCIला घ्यावा लागेल मोठा निर्णय

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माबेन स्टोक्सरिषभ पंत