Join us  

IND vs ENG, 4th Test : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली; विराट कोहलीची MS Dhoniच्या विक्रमाशी बरोबरी

ind vs eng 4th test cricket 2021 Narendra Modi Stadium live score भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) सुरुवात होत आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: March 04, 2021 9:18 AM

Open in App

Ind vs Eng 4th test Live score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीला आजपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) सुरुवात होत आहे. मालिका वाचवण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाच्या नाणेफेकीचा कौल पडला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडनं आजच्या सामन्यासाठी एक अतिरिक्त फलंदाजासह दोन बदल केले आहेत, तर टीम इंडियात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्या जागी मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. याचा अर्थ उमेश यादवला ( Umesh Yadav) बाकावरच बसून रहावे लागणार आहे. आजच्या सामन्यासाठी मैदानावर उतरताच विराट कोहलीनं ( Virat Kohli) भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याच्या विक्रमाशी बरोबरी केली. ind vs eng 4th test

भारताकडून सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करणारे कर्णधारविराट कोहली - ६०*महेंद्रसिंग धोनी - ६०सौरव गांगुली - ४९मोहम्मद अझरुद्दीन - ४७सुनील गावस्कर - ४७    इंग्लंड - डॉम सिब्ली, झॅक क्रॅव्ली, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, ऑली पोप, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, डॉम बेस, जॅक लिच, जिमी अँडरसनभारत - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, इशांत शर्मा मोहम्मद सिराज  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीजसप्रित बुमराहमोहम्मद सिराज