Join us  

Ind vs Eng 3rd Test : इंग्लंडचा डाव गडगडला अन् वीरेंद्र सेहवागनं राहुल गांधी यांचा 'तो' Video पोस्ट केला 

Ind vs Eng 3rd Test : स्थानिक खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे खेळाडू सहज अडकले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 24, 2021 6:47 PM

Open in App

Ind vs Eng 3rd Test : स्थानिक खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे खेळाडू सहज अडकले. अक्षर पटेलनं ३८ धावांत ६ विकेट्स, तर आर अश्विननं २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या आणि इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गडगडला. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागताच इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारतीय फिरकीपटूंनी त्याला हा निर्णय का घेतला, असा विचार करण्यास भाग पाडले. खेळपट्टीचा अंदाज घेत कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) लगेच फिरकी गोलंदाजांना पाचारण केलं आणि त्याचा हा डाव यशस्वी ठरला. इंग्लंडचा डाव गडगडला अन् भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांचा जुना व्हिडीओ पोस्ट करून इंग्लंडला ट्रोल केलं. 

अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे. या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्मा याचा यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इशांत शर्मानं तिसऱ्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली ( ०) याला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हाती झेलबाद करून माघारी पाठवलं. ५० हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.Ind Vs Eng Live Match 

आर अश्विननं इंग्लंडचा कर्णधार जो रूटला ( १७) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. झॅक क्रॅव्ली हा एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु पटेलनं त्याला बाद केलं. क्रॅव्लीनं ५३ धावा केल्या. जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ऑली पोप हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर इंग्लंडची अवस्था आणखी बिकट झाली. भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळला. स्टुअर्ट ब्रॉडची विकेट घेत अक्षर पटेलनं या कसोटीतही पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. डे नाईट कसोटीत पाच विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय, तर जगातला सहावा गोलंदाज ठरला आहे.  Ind vs Eng Pink Ball test match

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविरेंद्र सेहवागराहुल गांधी