IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का, प्रमुख गोलंदाजाची कसोटी मालिकेतूनच माघार

IND vs ENG 3rd Test : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला १५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:34 AM2024-02-12T09:34:46+5:302024-02-12T09:36:17+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd Test : England's Left-arm spinner Jack Leach ruled out of remainder of India tour | IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का, प्रमुख गोलंदाजाची कसोटी मालिकेतूनच माघार

IND vs ENG : इंग्लंडला मोठा धक्का, प्रमुख गोलंदाजाची कसोटी मालिकेतूनच माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 3rd Test ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीला १५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघात विराट कोहलीचे पुनरागमन या मालिकेत तरी अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. BCCI ने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला आणि त्यात विराटचे नाव नव्हते. इंग्लंडने पहिली कसोटी जिंकून मिळवलेल्या आघाडीला भारताने दुसऱ्या कसोटीत प्रत्युत्तर दिले आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. आता तिसऱ्या कसोटीत कोण बाजी मारतंय याची उत्सुकता आहे, परंतु पाहुण्या इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.


इंग्लंडचा सर्वात अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लिच ( Jack Leach) याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांतून माघार घेतली. हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत लिच याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्याला विशाखापट्टणम कसोटीला मुकावे लागले होते. आता तर त्याने संपूर्ण मालिकेतून माघार घेतली आहे आणि इंग्लंडने त्याच्या बदली कोणाला रिप्लेस करायचे नाही, असा निर्णय घेतला आहे.  


इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार पुढील २४ तासांत लिच अबु धाबी येथून लंडनसाठी रवाना होईल. दुसऱ्या कसोटीनंतर इंग्लंडचा संघ अबु धाबी येथे आला होता आणि आता तेही तिसऱ्या कसोटीसाठी लिच याच्याशिवाय राजकोट येथे दाखल होतील. दरम्यान, लिच याच्या दुखापतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे.  


शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतात संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
 

Web Title: IND vs ENG 3rd Test : England's Left-arm spinner Jack Leach ruled out of remainder of India tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.