IND vs ENG 3rd Test Day 4 Mohammed Siraj vs Ben Duckett : लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळात मोहम्मद सिराजनं इंग्लंडची सलामी जोडी फोडत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या डावातील ६ व्या षटकात बेन डकेट मोठा फटका मारायला गेला अन् तो सिराजच्या जाळ्यात अडकला. जसप्रीत बुमराहने एक सोपा झेल टिपला अन् अवघ्या १२ धावा करून त्याला तंबूचा रस्ता धरायला लागला. ही विकेट मिळाल्यावर मोहम्मद सिराजनं अगदी आक्रमक अंदाजात त्याच्या विकेटचं सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या दिवसाअखेर जे घडलं त्याचा बदला घेतल्याचा भाव त्याच्या सेलिब्रेशनमध्ये दिसून आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिसऱ्या दिवसाअखेर घडलं त्याचा चौथ्या दिवशी तासाभरात घेतला बदला
भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशीच इंग्लंडच्या संघाने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली होती. बुमराह घेऊन आलेल्या पहिल्या षटकात झॅक क्राउलीनं टाइम पास करताना पाहायला मिळाले. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलसह मोहम्मद सिराज इंग्लंडचा सलामीवीरांना भिडल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गिल अन् बेन डकेट दोघे एकमेकांसमोर आल्याचे पाहायला मिळाले होते. तिसऱ्या दिवसाअखेरचा हा सीन चौथ्या दिवशी काहीतरी घडवून आणणार असाच होता. झालेही तसेच. सिराजनं बेन डकेटची विकेट घेतल्यावर अगदी त्याच्या जवळ जाऊन आक्रमक अंदाजात विकेटचा आनंद व्यक्त केला. इंग्लंडच्या संघाने २२ धावांवर आपली पहिली विकेट गमावली.
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
ओली पोपच्या रुपात सिराजनं यजमानांना दिला आणखी एक धक्का
चौथ्या दिवसाच्या खेळात DSP सिराज चार्ज घेतल्यापासून अचूक टप्प्यावर भेदक माराा करताना दिसला. पहिली विकेट मिळाल्यावर याच स्पेलमधील सहाव्या षटकात त्याने आणखी एक विकेट्स आपल्या खात्यात जमा केली. त्याने ओली पोपला ४ धावांवर माघारी धाडले. पायचितच्या मैदानातील पंचांनी पायचितची अपील फेटाळल्यावर मोहम्मद सिराजनं कर्णधार शुबमन गिलला DRS साठी मनवले अन् हा निकाल भारताच्या बाजून लागला. इंग्लंडच्या संघाने ४२ धावांवर विकेट गमावली.
Web Title: IND vs ENG 3rd Test Day 4 Mohammed Siraj Show Aggression After Take Ben Duckett Wicket Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.