Join us  

मोहम्मद सिराजला अचानक रिलीज करण्याचा घेतला निर्णय; BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण 

IND vs ENG 2nd Test Live Scorecard - भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धक्क्यांमागून धक्के बसताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 9:34 AM

Open in App

IND vs ENG 2nd Test Live Scorecard ( Marathi News ) - भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धक्क्यांमागून धक्के बसताना दिसत आहेत. विराट कोहलीने आधीच पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली असताना हैदराबाद कसोटीनंतर रवींद्र जडेजा व लोकेश राहुल यांना दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. मोहम्मद शमीही दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. त्यात बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीपूर्वी जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj ) याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

जडेजाला हॅमस्ट्रींग दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी ४ ते ८ आठवडे पुरेसे असतात, परंतु जडेजाला त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही खेळण्याची शक्यता मावळली आहे. रांची येथे २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही कसोटी होणार आहे. मोहम्मद शमीच्या दुखापतीतचे अपडेट्स पाहता तो या संपूर्ण मालिकेलाच मुकणार आहे. लोकेश राहुल तिसऱ्या कसोटीतून पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.

आजच्या सामन्यात भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. जडेजा व लोकेश आधीच संघाबाहेर आहेत आणि त्यात आज सिराजलाही रिलीज केले गेले आहे. या तिघांच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादव, रजत पाटीदार व मुकेश कुमार यांना संधी दिली गेली आहे. बीसीसीआयने सिराजबद्दल माहिती दिली की, त्याला दुसऱ्या कसोटीपूर्वी रिलीज केले गेले आहे. या मालिकेचा कालावधी लक्षात घेता आणि सततचे क्रिकेट पाहता हा निर्णय घेतला गेला आहे. तो राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध असेल. दरम्यान आवेश खान संघात परतला आहे.  

भारतीय संघ - यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत, आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडमोहम्मद सिराज