IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहलीचा विक्रम, बेन स्टोक्सला तंबी अन् तासाभरात टीम इंडियानं गमावले सलामीवीर

India vs England, 2nd ODI : भारतीय संघाचे सलामीवीर तासाभराच्या खेळात माघारी परतल्यानं टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती, पण कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या जोडीनं टीम इंडियाचा डाव सावरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 02:50 PM2021-03-26T14:50:35+5:302021-03-26T14:51:26+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 2nd ODI : Virat Kohli completed 10,000 runs at number 3 in ODI, Ben Stokes caught applying saliva on the ball | IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहलीचा विक्रम, बेन स्टोक्सला तंबी अन् तासाभरात टीम इंडियानं गमावले सलामीवीर

IND vs ENG, 2nd ODI : विराट कोहलीचा विक्रम, बेन स्टोक्सला तंबी अन् तासाभरात टीम इंडियानं गमावले सलामीवीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 2nd ODI : भारतीय संघाचे सलामीवीर तासाभराच्या खेळात माघारी परतल्यानं टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती, पण कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या जोडीनं टीम इंडियाचा डाव सावरला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर ( Jos Buttler) यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा डाव सावरताना कोहलीनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. भारतीय संघानं आजच्या सामन्यात रिषभ पंतला संधी देत एक बदल केला, तर इंग्लंडच्या संघात तीन बदल पाहायला मिळत आहेत. ind vs eng Live, 2nd odi ind vs eng Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज 

पहिल्या वन डे सामन्यात ९८ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला ( Shikhar  Dhawan) आज आपयश आलं. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या रिले टॉप्लीनं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. धवन ( ४) स्लीपमध्ये बेन स्टोक्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर सॅम कुरननं इंग्लंडला मोठी विकेट मिळवून दिली. रोहित शर्मा ( २५) ९व्या षटकात कुरनच्या गोलंदाजीवर आदिल राशिदच्या हाती झेल देऊन बाद झाला.  2nd ODI live, 2nd odi ind vs eng Live, 2nd odi ind vs eng Live Score १३८ चेंडूंत ३५० धावा कुटणाऱ्या फलंदाजाला इंग्लंडनं मैदानावर उतरवलं, टीम इंडियाचं वाढलं टेंशन

विराटचा विक्रम..
विराटनं तिसऱ्या क्रमांकावर १०००० धावा पूर्ण केल्या. वन डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर १०००० धावा करणारा तो जगातला दुसरा फलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनं ३३० सामन्यांत १२,६६२ धावा केल्या आहेत. विराटनं १९० डावांत ६२च्या सरासरीनं १०००० धावा केल्या. त्यानंतर कुमार संगकारा ( ९७४७), जॅक कॅलिस ( ७७७४) व केन विलियम्सन ( ५४२१) यांचा क्रमांक येतो.

बेन स्टोक्सला ताकीद
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स चेंडूला थुंकी लावताना पकडला गेला आणि त्याला अम्पायरनं ताकीद दिली. मैदानावरील पंच विरेंदर शर्मा यानं त्याची ही चूक पकडली. त्यानंतर चेंडूला सॅनिटायझरने साफ केलं गेलं.  

Web Title: IND vs ENG, 2nd ODI : Virat Kohli completed 10,000 runs at number 3 in ODI, Ben Stokes caught applying saliva on the ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.